राज्याचा खरा मुख्यमंत्री नेमका कोण -आदित्य ठाकरें
पुणे : वेदांता फॉक्सकॉन कंपनी महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात आज पुणे जिल्ह्यातील तळेगावात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. राज्याचा खरा मुख्यमंत्री नेमका कोण आहे हेच राज्याला अजून समजलेलं नाही.अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. आजचा हा आक्रोश मोर्चा काढण्याचे कारण म्हणजे राज्यातून जे प्रकल्प बाहेर जात आहेत, त्याबाबत जनतेला आणि तरुणांना माहिती देण्यासाठी आपण आलो आहोत. असे , आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
दोन महिन्यात आपल्याला रोजगार मिळेल की नाही, हा सामान्यांचा प्रश्न आहे. त्यांना खोके मिळाले, त्यांचे सरकार बनले, ते ओके झाले. मात्र, सर्वसामान्यांच्या राजगाराचे काय हा प्रश्न आहे. सर्वसामान्यांचा रोष आपल्याला दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अग्रवाल यांनी ट्विट करत प्रकल्प गुजरात नते असल्याची माहिती दिली. तेथील उद्योगमंत्री आणि तेथील सरकारने केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
प्रकल्प गुजरातला जातो, याचा दुःख नाही. मात्र, आपल्या राज्याच्या हक्काचे काय, असा प्रश्न निर्माण होतो, चांगले प्रकल्प आपल्या राज्यात येण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. हा प्रकल्प 100 टक्के या महाराष्ट्रात तळेगावात येणार हे ठरले होते. असे असतानाही हा प्रकल्प तुम्ही पळवला कसा, तुम्ही आमचे आमदार पळवले, तसा हा प्रकल्पही गुजरात, गुवाहाटी, गोवा आणि महाराष्ट्र असा फिरवणार आहात का, असा सवालही त्यांनी केला.
गेल्या वर्षी या प्रकल्पाचा पाठपुरावा करत आपण अग्रवाल यांना राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात प्रकल्प उभा करायचा असेल, तिथे करा. जी मदत लागेल ती सरकार करेल, असे आपण अग्रवाल यांना सांगितले होते. दावोसमध्ये आपण मोठी गुंतवणूक राज्यासाठी आणली. त्याचवेळी त्यांचे वेगळे उद्योग सुरू होते. त्यांना दडपण असेल, मात्र, खोके घेत, ओके होत ते राज्याला मागे टाकायला निघाले होते.
अनेक वाहिन्यांनी तळेगाव आणि गुजरातमध्ये दाखवलेला फरक सर्वांसमोर आहे. गुजरातपेक्षा आणि त्यांना जास्त सुविधा देणार होतो. असे असतानाही जिथे पाणी, वीज सेवा अशा सुविधा नसताना हा प्रकल्प तिथे गेलाच कसा. हे खोके सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच. हे खोके सरकार आल्यावर त्यांनी हा प्रकल्प गुजरातला पळवला. आपण केंद्राला आणि गुजरातला दोष देणार नाही. खोके सरकारमुळेच हा प्रकल्प गुजरातला गेला आहे. त्यांच्या नाकर्तेपणामुळे हा प्रकल्प गुजरातला गेला. त्यांच्या रिपोर्टमध्येही महाराष्ट्र नंबर एकवर आहे. मात्र, आपल्या मुख्यमंत्र्यांना या प्रकल्पाची माहितीच नव्हती. त्यांनी उद्योगांनाही 50 खोके देत सर्व ओके केले असते. असा टोलाही त्यांना लगावला.
आदित्य ठाकरे म्हणाले,सध्या खुर्चीचे वेगळेच राजाकारण सुरू आहे. अनेकदा याबाबत त्यांनी दिशाभूल करणारी माहिती दिली. 80 टक्के भूमिपुत्रांना नोकरी मिळाली पाहिजे, ही आपली भूमिका आहे. महाविकास आघाडीने साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक आणली होती. रोजगारनिर्मितीचे आपले स्वप्न होते. ते स्वप्न मोडत खोके सरकारने प्रकल्प गुजरातला पाठवला. आपण भवितव्यासाठी पुढच्या 50 वर्षांसाठी कोण भांडत आहे, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तुम्ही खोके घेत ओके झाला आहात. आमच्या तरुणांच्या रोजगाराचे काय,.हा प्रश्न आहे. असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
मेडिसीन डिव्हाइस पार्कसाठी संभाजीनगरसाठी आम्ही प्रस्ताव दिला होता. मात्र, केंद्र सरकारने उत्तर दिले नाही. सुभाष देसाई उद्योगमंत्री होते. तेव्हा त्यांनी दोन वर्षात साडेसहा लाखांची गुंतवणूक आणली. आताचे उद्योगमंत्र्यांना वेदांताबाबत माहिती नाही. पावणेदोन लाखांची गुतंवणूक आणि लाखभर तरुणांना रोजगार देणाऱ्या प्रकल्पाबाबतच उद्योगमंत्र्यांना माहिती नाही. आपण यापेक्षा मोठे प्रकल्प आणू, असे ते म्हणाले. त्यांना गाजर दाखवले आहे. तुम्ही जनतेला गाजर दाखवू नका, असे त्यांनी ठणकावले.
