fbpx

रिफायनरी बद्दल महाविकास आघाडीला विचारले पाहिजे -केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

पुणे : वेदांत- फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली जात आहे. शिंदे – फडणवीस सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणि केंद्र सरकारच्या दबावामुळे हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याचा आरोप करत विरोधक करत आहेत त्याच्या निषेधार्थ आदित्य ठाकरे यांनी आज तळेगाव येथे जन आक्रोश मोर्चा काढला . त्यावर ऑइल, रिफायनरी,नानार प्रकल्प यासह अजून प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गेले आता वेदांत गेला म्हणून विरोध करत होते.त्यावेळेस का नाही विरोध केला.महाविकास आघाडी ला या प्रकल्पा बाबत विचारलं पाहिजे. अशा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्या पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हणाल्या.

या पत्रकार परिषदेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राम शिंदे, आमदार माधुरी मिसाळ भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, राहुल शेवाळे उपस्थित होते.
निर्मला सीतारामन म्हणाल्या,मुबंई कारशेड ला विरोध करणारे. हे आता मुबंई बाबत बोलत आहेत. बुलेट ट्रेनला परवानगी दिली तर श्रेय पंतप्रधानाना जाईल म्हणून फक्त विरोध.हे थांबवून कोणाला आनंद झाला असा सवाल निर्मला सीतारामन यांनी उपस्थित केला.
सीतारामन म्हणाल्या की, केंद्र सरकारच्या योजनांबाबत लोकांना भेटले. केंद्र सरकारच्या योजनांबाबत जनजागृती केली. भारतीय जनता पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी मी आली आहे. त्यासोबतच केंद्र सरकारच्या योजना पोहचण्यासाठी मी बारामतीत आले आहे. बारामतीमध्ये भाजपचे संघटन चांगलं आहे. सेवाभावी वृत्तीने भाजपचे कार्यकर्ते काम करत आहेत. कोविडच्या काळात भाजपकडून जेवढे काम झाले, तेवढे काम अन्य कोणत्याही पक्षाकडून झालेले नाही. भाजपच्या सेवा सेलचे कार्यकर्ते कोविडपासून आजपर्यंत मैदानात उतरून काम करताना दिसत आहेत. तसेच लोहगाव विमानतळ संपूर्ण काम मार्च २०२३ पर्यत काम होईल. असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. 

सहकारवरून पवारांना टोला 

पुणे:सहकाराचा राजकारण करणाऱ्यांनी कधीही केंद्रीय सहकार मंत्रालय बनविण्याचा प्रयत्न केला आहे. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सहकार मंत्रालय बनवलं. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सहकाराचे क्षेत्र आहे. सहकाराचा कधीही राजकारणासाठी उपयोग केला नाही पाहिजे, असे सांगणाऱ्या मोठ्या नेत्यानेही आतापर्यंत स्वतंत्र सहकार मंत्रालय बनवलं नाही, अशा शब्दांत निर्मला सीतारामन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेतला टोला लगावला.

Leave a Reply

%d bloggers like this: