fbpx

महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरे यांना आता सिरीयस घेत नाही-चंद्रशेखर बावनकुळे

पुणे : उद्धव ठाकरेंनी २१ सप्टेंबरच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात भाजप आणि शिंदे गटावर तुफान टीका केली होती. तुमच्या आयुष्यातली ही शेवटची निवडणूक आहे असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले होते. त्यावर
महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरे यांना आता सिरीयस घेत नाही. अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,निर्मला सीतारामन बारामती दौरा सुरू आहे.१८ महिने प्रवास आहे.केंद्र सरकारच्या योजना पोहचल्या की नाही.महाविकास आघाडी यांनी केल्या योजना त्याबदल सितारामन यांनी बारामती सांगितले. असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
भाजप बारामतीत घड्याळ पाडणार का असा प्रश्न सगळ्यांना पडत आहेत. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.आम्ही घडी चिन्ह बारामतीतून बंद पडेल आमचा प्रयत्न सुरू आहे,घड्याळाचा काटा बारामती मध्ये पडला पाहीजे. असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले .
महाविकास आघाडीमध्ये असलेल्या सर्वच पक्षात धुसपुस सुरू होती. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही ती सुरू होती. ती आता चव्हाट्यावर येत आहे. अजित पवार यांनीच वक्तव्य केले आहे की, मला त्या सरकारमध्ये असताना गृहमंत्री व्हायचे होते. त्यांच्याच तोंडून हे आले आहे. त्यामुळे या पक्षाची अवस्था एक दिवस अशी होईल की त्या पक्षात कुणी राहणार नाही. लवकरच मोठा बॉम्ब ब्लास्ट या पक्षात होणार आहे. अजित पवार पुन्हा भाजप मध्ये येतील काय? या प्रश्नावर मात्र त्यांनी मिश्किलपणे सांगितले की, या पक्षात लवकरच बॉम्ब ब्लास्ट होईल.असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
शिंदे व फडणवीस सरकारचा अजून नवीन मंत्रिमंडळ विस्तार व व प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री भेटला नाही. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,मुख्यमंत्री यांना मंत्रिमंडळ विस्तार आणि पालकमंत्री बाबत मीडिया निरोप कळवतो.असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: