fbpx

‘हा’ मराठमोळा तरूण होणार आमीर खानचा जावई

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा जावई कोण होणार? हे आता उघड झाले आहे. कारण अमिरची लेक इरा खान हिला तिच्या बॉयफ्रेंडने प्रपोज केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नूपुर शिखरे असे इराच्या बॉयफ्रेंडचे नाव असून त्याने प्रपोज केल्यावर इराने देखील लगेच होकार देत अंगठी हातात घालून घेतली आहे. त्यामुळे नुपूर शिखरे हा मराठमोळा तरूण आमीर खानचा जावई होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

कोण आहे नुपूर शिखरे?

नुपूर हा बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना फिटनेसचं प्रशिक्षण देतो. त्याचप्रमाणे तो उत्तम डान्सरसुद्धा आहे. इतकंच नव्हे तर तो राज्यस्तरीय टेनिसपटूही होता. नुपूरचा जन्म 17 ऑक्टोबर 1985 रोजी पुण्यात झाला. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने मुंबईत आर. ए. पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली. नुपूरची आई प्रीतम शिखरे या नृत्य शिक्षिका आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: