fbpx

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या 60 ते 70 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

पुणे :पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयांवर देशभरात छापेमारी सुरू केली आहे.महाराष्ट्रातही पुणे, नवी मुंबई, भिवंडी, औरंगाबादसह ठिकाणी छापेमारी झाली .त्या कारवाईत PFI संगणकाच्या भरपूर लोकांना अटक झाली. त्याचा निषेध करण्यासाठीआंदोलन करणाऱ्या 60 ते 70 जणांवर पुणे पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शुक्रवारी हे आंदोलन करण्यात आले होते. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिजाज जैनुद्दीन सय्यद (वय 26, शिवनेरी नगर कोंढवा खुर्द) याच्यासह 60 ते 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादवी 141 143 145 147 149 188 341 सह मपोका 37/1/3 सह 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार नवनाथ डांगे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
प्रकरणी अधिक माहिती अशी की, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेकायदेशीर जमा जमा करून आंदोलन केले. NIA, ED या केंद्रीय तपास यंत्रणेने पीएसआय च्या राज्यस्तरीय नेत्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ आरोपींनी मोठमोठ्याने घोषणा देत रस्ता अडवला. येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना व वाहनांना अडथळा निर्माण करून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. बंड गार्डन पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: