fbpx

शिंदे गटाला मोठा धक्का; शिवतीर्थावर ठाकरेंचाच दसरा मेळावा; शिवसैनिकांचा जल्लोष

पुणे : दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्क मैदान देण्याच्या याचिकेवर उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. यामध्य़े ठाकरे गट, शिंदे गट आणि पालिकेच्या वतीने युक्तीवाद करण्यात आला. शिंदे गट आणि ठाकरे गटाने उच्च न्यायालयात आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा युक्तीवाद केला. न्यायालयाने तुमचा युक्तीवाद मर्यादित ठेवा, निर्णयही द्यायचा आहे, असे तिन्ही बाजुंना सांगितले. या युक्तीवादानंतर न्यायालयाने शिवाजीपार्कवर दसरा मेळावा होणार? कोणत्या गटाचा होणार, यावर निर्णय दिला. ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्कवर परवानगी देण्यात आली आहे. 

या आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आज पुण्यात शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. यावेळी शिवसैनिकांनी फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला.
यामध्ये शिवसेनेचे पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे, गजानन थरकुडे,संगीता ठोसर,यांनी किशोर राजपूत, युवराज पारिक, तानाजी लोकरे, आबा कुंभारकर, कल्पना थोरवे, सविता मते, सीमा गायकवाड, श्रुती नाजीरकर, विजय जोरी, भरत आबा कुंभारकर, बाळकृष्ण वांजळे, योगेश पवार, सचिन मोहिते,संगीता ठोसर, विजया मोहिते व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा जल्लोष पुण्यात ओंकारेश्वर मंदिर येथे करण्यात आला.

संजय मोरे म्हणाले, खरी शिवसेना ही आमच्या बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांची आहे. शिंदे गट कितीही उड्या मारत असला तरी शिवसेनाही शिंदे गटाची होणार नाही. आता तर खरा आमचा विजय सुरू झाला आहे. शिव सेना कोणाची आहे सुप्रीम कोर्ट चांगलाच निर्णय देईल. मुंबई उच्च न्यायालयाने जो दसरा मेळा बाबत जो निर्णय दिला आहे. त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत. आमच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा जोरात होणार. असे संजय मोरे म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: