fbpx

जाणून घ्या काय आहे घटस्थापनेचा मुहूर्त

देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे

अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून होणाऱ्या नवरात्र काळात शरद ऋतू असल्याने या नवरात्रास शारदीय नवरात्र असे म्हणतात. हे नवरात्र शरद ऋतूत येते म्हणून यास शारदीय नवरात्र म्हणतात. नवरात्र हा अत्यंत महत्वाचा कुलधर्म असून तो घरोघरी कटाक्षाने पाळला जातो.
आपण देवघरात रोज पूजा करत असलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिका अधिक प्रभावी व्हावे, त्याचे आपल्या घरावर कृपाछत्र असावे, या हेतूने शास्त्रात नवरात्र सांगितले आहे. अनादी काळापासून आपल्याकडे नवरात्राची परंपरा आहे.

काही जणांकडे वेदिका (शेत) स्थापना करतात, त्यासाठी वेदिकेत शेतातील काळी माती आणून त्यात सप्तधान्ये हळदीच्या पाण्यात रंगवून पेरावीत. नवरात्रात घटस्थापना प्रातःकाळी करावी असे सांगितलेले असल्याने सूर्योदयापासून सकाळी १०:२५ पर्यंत केव्हाही घट बसवता येतील. आपल्या घरच्या परंपरेनुसार या दिवशी नवरात्र बसवावे.

Leave a Reply

%d bloggers like this: