Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

बारामतीला कुणी गेले की, ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज करतात – अजित पवार

पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण या बारामतीत आल्या आहेत. यावेळी चारशेच्या वर लोकसभेचा आकडा जावा. असे वक्तव्य निर्मला सीतारामन यांनी केले. त्यावरभाजप प्रयत्न करते. तो त्यांचा अधिकार आहे.आघाडीच्या जास्तीत-जास्त जागा निवडून याव्यात म्हणून आमचा प्रयत्न आहे. बारामतीला कुणी गेले की, ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज करतात असे राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे पुण्यात पत्रकारांची संवाद साधताना म्हणाले.
अजित पवार यांनी आज कसबा विधानसभा, शिवाजीनगर विधानसभा , कोथरूड विधानसभा , खडकवासला विधानसभा मतदारसंघ , हडपसर विधानसभा , वडगांवशेरी विधानसभा , पर्वती विधानसभा, पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा व नेत्यांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांची संवाद साधला.
अजित पवार म्हणाले,तर मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही भेटलो त्यामागचं कारणही अजित पवारांनी सांगितलं.15 जुलैला मुख्य सचिव यांची बैठक घेतली होती. वेदांतला आणखी काही सवलती देता येतील, काय भूमिका घ्यायची. त्यात प्रमुख लोकं होते. तुम्हीही पत्रकार आहात. मलाही काही कागदपत्र मिळाली आहेत. त्यावर कुणी काही बिनबुडाचे आरोप करत असतील, तर त्याला किती महत्त्व द्यायचं. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. असे अजित पवार म्हणाले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामननुकत्याच बारामतीला आल्या आहेत त्यावर अजित पवार म्हणाले, त्यांच्याबद्दल मी चांगले मत मांडतो. त्यांचा आदर करतो. राज्यात मी अर्थमंत्री असताना केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मला जेएससी कौन्सिलचे अध्यक्षपद दिलं होतं. तेव्हा आम्ही अर्थमंत्री म्हणून एकमेकांशी बोलायचो. प्रश्न सोडवायचो. असं अजित पवार म्हणाले .
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सतत दिल्ली दौरा करत आहेत. त्यावर अजित पवार म्हणाले,कोणताही प्रकल्प मंजूर करण्यासाठी दिल्लीला जायचं असतं. त्यासाठी संसदेत काम करणाऱ्या सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, वंदना चव्हाण, फौजिया खान, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे सक्षम आहेत. त्यात मी लक्ष घालण्याचं कारण नाही. मी राज्यातील प्रश्नांवर लक्ष घालतो. असे बोलून अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना टोला ला लगावला.
अजित पवार म्हणाले,मीकेंद्रात पाठपुरावा करायला लागायचा. तेव्हा शरद पवार यांना सांगायचो. किंवा जे कुणी प्रमुख असतील त्यांना सांगायचो. नितीन गडकरी यांनाही मी अनेकदा जाऊन भेटतो. हे प्रश्न आहेत, याच्यात लक्ष घाला.हे काम काही वैयक्तिक नसतं. हे राज्याचं काम असतं. राज्याचा फायदा व्हावा, यासाठी कोण कुठल्या पक्षाचा आहे, हे बघायचं नसतं. केंद्राचे किंवा राज्याचे मंत्री हे देशाचा किंवा राज्याचा विचार करून योग्य निर्णय घेतात. असे अजित पवार म्हणाले.
अजित पवार यांनी आज पुण्यातील प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतला. त्यावर अजित पवार म्हणाले,कुठल्या जिल्ह्याच्या निवडणुका केव्हा लागतील. काही सांगता येत नाही. पालकमंत्री म्हणून काम करताना मला कार्यकर्ते, आमदार यांनी सहकार्य केलं. आढावा बैठका घेऊन व्हर्च्युअल बैठका घेण्याचं काम केलं. सभासद नोंदणी झाली का, काय चाललंय. प्रभाग तीनचा होईल की, चारचा होईल. यासंदर्भात लक्ष घालत असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading