fbpx

जेईई मध्ये 197 वी रँक घेणारा नऱ्हे येथील आकाश बनसोडे यांचा नऱ्हे ग्रामस्थाच्या वतीने सत्कार

पुणे : नऱ्हे येथील रहिवाशी श्री आण्णासाहेब बनसोडे यांचा मुलगा श्री आकाश बनसोडे यांनी देश पातळीवरील जेईई परीक्षेत देशात १९७ वा क्रमांक पटकवला आहे. आकाशाच्या या यशाचे कौतुक करत नऱ्हे ग्रामस्थांच्या वतीने त्याचा आज सत्कार करण्यात आला.

घरची परिस्थिती बेताची वडील एक कंपनीत कामाला आहेत व आई नवले रुग्णालयात मावशी म्हणून काम करत आहे. वनआरके मध्ये राहणाऱ्या आकाश ने कोणताही खाजगी क्लास लावलेला नाही. त्याने स्वत: अभ्यास केला अतिशय प्रतिकूल परिस्थिती ,वन रूम किचन चे घर ,कोणता हा क्लास नाही,युट्युब वरून अभ्यास केला व इतर मुलांची पुस्तक व नोट्स वापरुन त्यांनी अभ्यास केला. जेईई च्या परीक्षेत आकाशाचा रॅंक ८०१३ असून प्रवर्गात 197 वा रँक मिळवत यश संपादन केले आहे. आता त्याची आय आय टी पवई मध्ये निवड झालेली आहे. त्याला सैन्यदलात जाऊन देशाची सेवा करायची आहे आणि तो नौदलतील परीक्षा उत्तीर्ण झाला असून मुलाखत होणे बाकी आहे.

नऱ्हे येथील ग्रामस्थाच्या वतीने त्याच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला तेव्हा डॉ विक्रम गायकवाड, राजेश बोबडे, चंद्रकांत घाणेकर , प्रशांत साळुंखे, विजय शिळीमकर आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: