पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे 28 सप्टेंबरला उदघाटन; तेजस्विनी पुरस्कार जाहीर
पुणे : महिलांच्या कला गुणांना वाव देणारा पुणे नवरात्रौ महिला महोत्सव यंदा 22 वे वर्ष साजरे करत आहे. यंदा हा महिला महोत्सव दि. 28 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीत होत असून याचे उदघाटन बुधवार दि. 28 सप्टेंबर रोजी दुपारी 1.00 वा. श्री लक्ष्मी माता मंदीर प्रांगण, मुक्तांगण शाळेजवळ, शिवदर्शन, पुणे येथे संपन्न होत आहे. ज्येष्ठ नाट्य व चित्रपट अभिनेत्री सुहासिनी देशपांडे या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
दरवर्षी विविध क्षेत्रातील ज्येष्ठ व तरूण अशा दोन कर्तबगार महिलांना या महिला महोत्सवात उदघाटन प्रसंगी तेजस्विनी पुरस्कार देऊन गौरविले जाते. ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे, मॉडेलिंग गृमिंग तज्ञ जुई सुहास आणि सह्याद्री क्रांती मळेगावकर यांना पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचा मानाचा ‘तेजस्विनी‘ पुरस्कार या उद्घाटन सोहळ्यात देऊन गौरविले जाईल. 5000/- रु. रोख, देवीची प्रतिमा, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे, अशी माहिती पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागूल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अनुराधा मराठे –
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका अनुराधा मराठे यांनी वयाच्या सातव्या वर्षापासून धुळ्यात डॉ. श्रीपाद नाईक यांच्याकडे गायनाचे धडे गिरवण्यास सुरूवात केली. विवाहानंतर पुण्यात आल्यावर शाळा व महाविद्यालयातील विविध संगीत स्पर्धांमध्ये त्या सदैव प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. भेंडी बाजार घराण्याचे पंडित डॉ. टी. डी. जानोरीकर आणि ज्येष्ठ गायक गजाननराव वाटवे यांच्याकडे त्यांनी शास्त्रशुद्ध सुगम व शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. त्यांचे टीव्ही प्रमाणेच गायनाचे अनेक जाहीर कार्यक्रम महाराष्ट्रात होत राहिले. तसेच त्यांच्या गायनाच्या कॅसेट व सीडीदेखील मोठ्या प्रमाणात प्रसारीत झाल्या आहेत. अनेक गौरवांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
जुई सुहास –
तरुण वयातच फॅशन कोरीओग्राफर, ग्रूमिंग मेंटर, कॉश्च्युम स्टायलिस्ट, डान्स कोरीओग्राफर अशी पारंपारीक पद्धतीपेक्षाही वेगळ्या वाटेने जाणार्या करीयरमध्ये जुई सुहास यांनी स्वताचा ठसा उमटवला आहे. 300 पेक्षा अधिक तरूण मुली आणि मुलांना मॉडेलिंगसाठीचे प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले आहे. त्या स्वत उत्तम कथ्थक नृत्यांगना आहेत. फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतान विनीत खत्री यांचे मार्गदर्शनाखाली त्यांनी फॅशन शो चे आयोजन केले होते. त्या नंतर त्यांना पुणे फेस्टिव्हलमध्ये मिस पुणे फेस्टिव्हलमध्ये मिस पुणे फेस्टिव्हल करण्याची संधी मिळाली. सन 2015 साली प्रकाशित झालेल्या मंत्र या चित्रपटासाठी त्यांनी कॉच्म्युम डिझाइनिंगचे आणि झिंग थिंग हे गाणे कोरिओग्राफ केले आहे.
सह्याद्री क्रांती मळेगावकर –
सह्याद्री ने वया च्या 4 वर्ष व्यासपीठ वर कलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली आतापर्यंत तीन 300 कार्यक्रम मध्ये काम केले आहे. सह्याद्रीने एक शॉर्ट फिल्म मध्येही काम केले आहे, तिच्या अनेक समाज प्रबोधन करणाऱ्या फिल्मस महाराष्ट्रभर वायरल झाल्या. यामध्ये प्रामुख्याने, मी शिवभक्त, शेतकऱ्याची व्यथा, प्राणी माझे मित्र, त्याचबरोबर सह्याद्री ने बेलोसा नावाच्या मुख्य भूमिका मध्ये लघुपटत काम केले आहे. आदिवासी समाजाच्या व्यथा मांडणाऱ्या लघुपट मनावरती गारुड घालतो, सह्याद्रीच्या बेलोसा मधिल भूमिकेला,22 नॅशनल इंटरनॅशनल बेस्ट चाइल्ड अवॉर्ड्स मिळेल, आहेत आतापर्यंत सह्याद्रीला सामजिक विविध संघटना संस्था यांच्या माध्यमातून 22 पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. सह्याद्रीची मुख्य भूमिका असणारा मोगरा हा मराठी चित्रपट येत आहे.
पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या उदघटन व तेजस्वी पुरस्कार विरतरण कार्यक्रमानंतर तेथेच होम मिनिस्टर हा स्पर्धा कार्यक्रम संपन्न होईल. या पूर्वी जयश्री फिरोदिया, मनिषा साठे, प्रियांका बर्वे, शीतल महाजन, शांताबाई किर्लोस्कर, प्राची वडवे, मीना फातरफेकर, मृणालिनी चितळे, वीणा देव, केतकी माटेगावकर, रोहिणी भाटे, किर्ती शिलेदार, ऋता बावडेकर, सुरू वाघमारे, शितल चव्हाण, मीनल मोहाडीकर, अभिलाषा चेल्लम, अनुराधा देसाई, सावनी राजेंद्र, तेजस्वीनी सावंत, मीरा बडवे, अंजली भागवत, कार्तिकी गायकवाड, सरस्वती राणे, सुजाता देशमुख यांना तेजस्वीनी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.