fbpx

मोदींनी संसदेच्या पायऱ्यांवर आपल डोकं टेकत संपूर्ण देशाची मने जिंकली -केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात मुख्यमंत्री पदापासून सुरू झालेल्या वीस वर्षांच्या कर्तव्यपथावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे *व्यवस्था परिवर्तनाची वीस वर्षे  या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी निर्मला सीतारामन यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

२०१४ ची लोकसभा निवडणूक ही भाजपने जिंकून एक नवा इतिहास रचला. त्यामुळे नरेंद्र मोदी यांचे भारतीय जनता पार्टीचे नेते कौतुक करत असतात. आज परत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०१४ ची निवडणूक खरच सोप्पी नव्हती, माञ मोदींनी सगळ्यांना एकत्र आणत ते करून दाखवलं.मोदींनी पहिल्याच दिवशी संसदेच्या पायऱ्यांवर आपल डोकं टेकत संपूर्ण देशाची मने जिंकली. असे वक्तव्य करून.निर्मला सीतारामन यांनी मोदींचे कौतुक केले.
या कार्यक्रमालामहाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,खासदार गिरीश बापट, खासदार प्रकाश जावडेकर, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार राम शिंदे भाजपचेपदाधिकारी व कार्यकर्तेहे उपस्थित होते.
निर्मला सितारामन म्हणाल्या,कुठलाही प्रशासकीय अनुभव नसताना गुजरात मध्ये आलेल्या भूकंपात मोदींनी सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून दाखवल्या त्यावेळी त्यांना प्रशासनाचा कुठलाच अनुभव नव्हता पण त्यांनी चॅलेंज स्वीकारलं.त्यांनी सगळ्यांना विश्वासात घेत सगळ्या गोष्टी सोप्या करून दाखवल्या.गुजरात मध्ये नरेंद्र मोदी यांनी अनेक लोक कल्याणकारी योजना राबवल्या. असे निर्मला सीतारामन म्हणाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाच वर्षात कसे काम केले.हे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
निर्मला सीतारामन म्हणाल्या ,मोदींनी शाळेत कधीच अन्न, पुस्तके आणि शाळेचा गणवेश फ्री देण्याच सांगितल नाही माञ त्यांनी लोकांना विश्वास पटवून दिला.मोदी मुख्यमंत्री असताना केंद्र सरकार त्यानं अनेकवेळा मदत करत नसे मात्र या अडचणीवर देखील त्यांनी मात केली आणि गुजरातचा विकास केला. असे निर्मला सीतारामन म्हणाल्या.
चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या आई वडिलांचे निधन झाले त्यांना मोफत शिक्षण देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्यांनी एक पालक गमावले आहे त्यांच्या पाल्यांना देखील मोफत शिक्षण देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आपला ऐतिहासिक वारसा समोर आणण्याचा प्रयत्न आहे. राज्यात एक लाख 75 हजार कोटी रुपयांची मेट्रोची कामे सुरू आहे. त्यामुळे सार्वजनिक व्यवस्था सक्षम होईल. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.  दीपक नागपुरे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: