fbpx
Saturday, December 2, 2023
Latest NewsMAHARASHTRANATIONALPUNETOP NEWS

मोदींच्या धोरणात्मक निर्णयांमुळे देशाचे स्वरूप बदलत आहे -केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

पूणे:संस्कृतीची जोपासना, डिजिटलायझेश, शेतकऱ्यांची वाढवलेली क्रयशक्ती, कोरोनाचे लसीकरण आणि देशात होत असलेली विकासकामे यासह अनेक बाबींतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःला सिध्द केले आहे. खोटे आश्वासने न देता पारदर्शक कारभार करत भ्रष्टाचार मुक्त सरकार त्यांनी चालवले आहे. मोदींच्या धोरणात्मक निर्णयांमुळे देशाचे स्वरूप बदलत आहे.असे मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केले.

सीतारामन म्हणाल्या, जगात देश महत्वपूर्ण भूमिका बजावत असून मोदी यांनी देशाला नवीन उंचीवर नेले आहे. पद्म पुरस्कारासाठी निवड करताना देशातील सर्वसामान्य परिस्थीतीमध्ये अभूतपूर्व काम करणाऱ्यांची निवड केली जात आहे. या सारखे अनेक परिवर्तन गेल्या काही दिवसांत झाले आहेत.

आंध्रप्रदेशमधील ज्योतिर्लिंग श्रीशैल्यम मंदिर आणि तामिळनाडूतील चेन्नईमधील कलिकांबा मंदिर या दोन ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांनी भेट दिली होती आणि ती माझ्या दृष्टीने शक्ती केंद्र आहे.
आंध्रप्रदेशमधील ज्योतिर्लिंग श्रीशैल्यम मंदिर आणि तामिळनाडूतील चेन्नईमधील कलिकांबा मंदिर या दोन ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांनी भेट दिली होती आणि ती माझ्या दृष्टीने शक्ती केंद्र आहे. असे निर्मला सीतारामन म्हणाल्या.
प्रधान नरेंद्र मोदी यांनी नोट बंदी करून सामान्य जनतेला व उद्योगपतींना दणका दिला होता. त्यावरत्यावर निर्मला सीतारामन म्हणाल्या,तामिळनाडू आणि कर्नाटक मध्ये कही लोक नंदी बैल घेऊन भिक्षा मागायला यायचे आणि त्यांच्यासोबत QR कोड असायाचा. असे निर्मला सीतारामन म्हणाल्या.

Leave a Reply

%d bloggers like this: