Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

आमच्या पाठीत खंजीर खुपसूला त्यावेळेस तुम्हाला काहीच नाही सुचलं- गिरीश महाजन

पूणे:आमच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेलात त्यावेळेस तुम्हाला काहीच का सुचलं नाही-क्रीडामंत्री गिरीश महाजन
पुणे:आदित्य ठाकरे यांनी बंडखोरीनंतर सातत्याने बंडखोर गटाला सातत्याने ‘गद्दार’ असे संबोधत केले आहे. तर आदित्य ठाकरे यांनी आमदारांवर वारंवार वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले आहेत. त्यावर ज्या वेळेला तुम्ही अडीच वर्षापूर्वी आमच्या सोबत विधानसभेला लढलात त्यावेळी आमच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेलात मग त्यावेळेस तुम्हाला काहीच का सुचलं नाही. असा प्रश्न क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे यांना विचारला.

महा विकास आघाडी सरकार बनण्यापूर्वी शिवसेना आणि भाजप युती होती पण ही आघाडी सुटल्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये सुरू झाले. भाजप सारखी म्हणते की शिवसेनेच्या 55 जागा आमच्यावर निवडून आले. त्यावर शिवसेनेने पण त्याला प्रत्युत्तर दिले आहे त्यावर गिरीश महाजन म्हणाले,आपण माननीय मोदीजींच्या फोटो लावून त्यांना आणि भाजपच्या नेत्यांना भाषणाला बोलवून आपण निवडून आलात.आणि म्हणून तुमच्या आमदारांची संख्या 55 पर्यंत गेली.तुम्ही जर त्यावेळी वेगळा लढला असता तर तुमचे 20 आमदार देखील निवडून आले नसते. अशी टीका शिवसेनेवर गिरीश महाजन यांनी केली.
वेदांत प्रकल्प शिंदे व फडणवीस सरकार मुळे राज्याच्या बाहेर गेला असा आरोप विरोधक करत आहे. त्यावर गिरीश महाजन म्हणाले,आमचं सरकार येण्याच्या आधीच त्यांची मनस्थिती अशी झाली होती. की आमचा प्रोजेक्ट महाराष्ट्रात नको तर गुजरातला हवा. असा सवाल ही गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडीला केला.

महाविकास आघाडी सारखे म्हणते, हा प्रकल्प शिंदे व फडणवीस सरकारने महाराष्ट्राच्या बाहेर नेला, गिरीश महाजन म्हणाले,वेदांत आणि दिलेल्या पत्राची दखल सहा महिने सरकारने घेतली नाही.
तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एखादी बैठक सुद्धा त्या अधिकाऱ्यांसोबत घेतली नाही.आणि त्यांची हीच उदासीनता पाहून प्रकल्प गुजरातला गेला.म्हणून कंपनीला वाटलं की महाराष्ट्र पेक्षा गुजरातच बरं.तुम्हाला वायनरी साठी बैठका घेतल्या दारू वरील टॅक्स कमी करायला बैठका घेता आल्या पण या प्रकल्पासाठी एकही बैठक तुम्ही घेतली नाही. असा सवालही त्यांनी मागच्या सरकारला केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading