महाराष्ट्राचा विकास मोदी, शहांच्या दयेवर होणार का? काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी
मुंबई : महाराष्ट्राचा विकास मोदी_शहांच्या दयेवर होणार का..? त्या करीताच त्यांच्या दावणीला ‘शिवरायांचा महाराष्ट्र’ बांधलाय का..? असे संतप्त सवाल विचारत, राज्यातील विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील तरूणांना मोठा रोजगार देणारा व पुर्वीच्या ‘मविआ सरकारने’ जास्त सुविधा व सबसिडी देऊकरून अनुकुलतेच्या वाटेवर ठेवलेला ‘वेदांत- फॉक्सपोन प्रकल्प गुजरात मध्ये जाणीवपुर्वक घालवल्याचे सांगुन “सुरत_गुहावटी_राज्यपाल” मार्गे ‘राज्याची सत्ता’ हाती-सोपविल्या बद्दल; मोदी-शहांना गुरू दक्षीणाच् बहाल केल्याचा आरोप काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी मुंबई येथून प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात केला आहे.
कोणत्याही राज्यात प्रकल्पांसाठी ‘करसवलती, जागा, पायाभूत सुविधा व सबसिडी’इ देऊ केल्यानंतर केंद्राची औपचारीक मान्यता ही लागतेच, हे किमान धोरण विद्यमान सरकारला माहीत हवे होते..त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारच्या जवळीकीचा फायदा ते ‘राज्याच्या हितासाठी’ करून घेऊ शकले नाहीत हे ‘ईच्छा शक्तीची वानवा असल्याचेच द्योतक आहे’.. असे ही काँग्रेस ने आपल्या प्रसिध्दी पत्रकात नमुद केले आहे..!
काँग्रेस आपल्या निवेदनात पुढे म्हणते की,
केंद्रातील पुर्वीच्या ‘काँग्रेस_युपीए’च्या पाठींब्या शिवायच गुजरात मध्ये ऊद्योग वसवले गेले काय…?
वास्तविक याचे भान ही आजच्या सत्ताधारी भाजपने ठेवले पाहीजे.. असे सांगुन, विकास व रोजगाराचे राजकारण करायचे नसते ही जाण देखील मोदी-शहांना ‘सत्तेच्या स्वार्थी राजकारणात’ राहिलेली नाही असेही
कॉंग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी म्हणाले..!
‘महाराष्ट्र राज्यं’हे गुजरात पेक्षाही, सर्व बाबतीत अग्रेसर असल्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मा पृथ्वीराज चव्हाण यांनी २०१४ साली आकडेवारी नुसार जाहीर केले होते व तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री मोदींना जाहीर चर्चेचे आव्हान देखील दिले होते. त्यामुळे महाराष्ट्र हा पुर्वीच्या सरकारांनी राबवलेल्या धोरणांमुळे स्वकर्तुत्वावर ऊभा असल्याची भावना तरी किमान पक्षीय अभिनिवेश सोडून राज्यकर्त्यांकडे असावी असे ही ते म्हणाले..!
पायाभूत सुविधा इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात ऊजव्या असल्यामुळेच, तळेगाव व बुरीबोटी’चे सर्वे वेदांत ने मान्य ही केले होते… मात्र गुजरात मधील भोलेरो येथील सर्वेक्षण अद्याप ही पुर्ण झाले नसल्याचे समोर येते.. मात्र तरी देखील, केंद्र सरकारच्या निव्वळ दबावामुळे संदर्भांन्कीत प्रकल्प गुजरात मध्ये गेल्याचे स्पष्ट झाले आहे.. वेदांता प्रकल्पास देऊ केलेल्या सबसिडी व सवलती कमी होत्या तर शिंदे-फडणवीस सरकारने वाढवून देण्यास त्यांचे कोणी हात बांधले होते..? त्यामुळे भाजपचा मविआ’ला दोष देण्याचा प्रयत्न हा राजकीय आकसापोटी केलेला तथ्यहीन व पोरकटपणाचा आहे अशी उपहासात्मक टीका ही काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली..!
