Saturday, September 12, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

माणिकराव गावित यांच्या निधनाने उपेक्षित घटकाच्या प्रश्नासाठी जागरूकपणे भूमिका घेणार व्यक्तिमत्व गमावले – शरद पवार


पुणे:तब्बल आठ वेळा खासदार म्हणून संसदेत निवडून आलेले लोकप्रिय नेते आणि माजी मंत्री माणिकराव गावित यांचं आज सकाळी निधन झालं आहे. त्याच्या निधनानंवर राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यावर
काही व्यक्तिच्यामध्ये उभं आयुष्य घालवल.त्यामध्ये माणिकराव गावित आहेत. माणिकराव गावित महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये माझे सहकारी होते. मी त्यांना इतक वर्ष जवळून पाहिले आहे. सामान्य कुटुंबातून आणि आदिवासी भागातून आलेला माणूस होता.परंतु समाजातील सर्व उपेक्षित घटकाच्या प्रश्नासाठी अंत्यत जागरूकपणे भूमिका घेणार व्यक्तिमत्व होत.आज माणिकरावच जाण्यानं राज्याच्या आदिवासी आणि गरीब जनतेच्या दृष्टीने चिंता करणारी बाब आहे.मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. असे बोलून पुण्यात पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी माणिकराव गावित यांना श्रद्धांजली वाहिले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading