Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

विनोदमूर्ती प्रकाश इनामदार करंडक रंगपंढरी, पुणेच्या ‘विषाद’ एकांकिकेस

पुणे : विजय पटवर्धन फाऊंडेशन आयोजित विनोदमूर्ती प्रकाश इनामदार करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत रंगपंढरीपुणेच्या ‘विषाद’ एकांकिकेने बाजी मारली असून पहिल्या क्रमांकाचा विनोदमूर्ती प्रकाश इनामदार करंडक आणि 25 हजार रुपये रोख पारितोषिक पटकाविले आहे. कलादर्शनपुणेच्या ‘यशोदा’ एकांकिकेस द्वितीय तर मुक्ताई फाऊंडेशनपुणेच्या ‘उरूस’ एकांकिकेस तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.

विनोदमूर्ती प्रकाश इनामदार करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे भरत नाट्य मंदिर येथे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत एकूण 24 संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे यंदाचे पहिले वर्ष आहे. स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रसिद्ध अभिनेतेलेखकदिग्दर्शक प्रवीण तरडेअखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसलेज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. स्पर्धेचे परिक्षक विनीता पिंपळखरेसौरभ पारखीनितीश पाटणकरफाउंडेशनच्या अध्यक्षा वृषाली पटवर्धनविजय पटवर्धनआदित्य मोडकप्रविण वानखेडेश्रेयस दीक्षितसचिन नगरकर रंगमंचावर होते. अंजली अभ्यंकरशेखर भागवत यांचीही उपस्थिती होती.

स्पर्धेचा सविस्तर निकाल

उत्कृष्ट एकांकिका प्रथम – ‘विषाद’रंगपंढरीपुणेद्वितीय – ‘यशोदा’कलादर्शनपुणेतृतीय – ‘उरूस’मुक्ताई फाऊंडेशनपुणे.

दिग्दर्शन – प्रथम – ज्ञानेश विधाते (‘विषाद’रंगपंढरीपुणे)द्वितीय – विनोद चंदनशिव (‘यशोदा’कलादर्शनपुणे)तृतीय – संध्या कुलकर्णी (‘जीर्णोद्धारनाट्यसंस्कार कला अकादमीपुणे)उत्तेजनार्थ – मुकुल ढेकळे (‘उरूस’मुक्ताई फाऊंडेशनपुणे)बॉबी (‘स्टार’जिराफ थिएटरटिटवाळा).

उत्कृष्ट अभिनय – पुरुष – अभिनेते आनंद अभ्यंकर स्मृती प्रथम पुरस्कार – अनिल आव्हाड (‘स्टार’जिराफ थिएटरटिटवाळा,), द्वितीय – संदीप बोडके (‘यशोदा’कलादर्शन पुणे)तृतीय – सुनील डोंगरे (‘विषाद’रंगपंढरीपुणे)उत्तेजनार्थ – सृजन देशपांडे (‘रोज मरे त्याला’आर. डी. क्रिएशनमुंबई)शर्व दाते (‘जीर्णोद्धारनाट्यसंस्कार कला अकादमीपुणे)विश्वास सकट (‘ऐन आषाढात पंढरपुरात’कलारंग पुणे)हेमंत शिर्के (‘उरूस’मुक्ताई फाऊंडेशनपुणे).

उत्कृष्ट अभिनय – स्त्री – अभिनेत्री विद्या भागवत स्मृती प्रथम पुरस्कार – सायली रौंदळे (‘विषाद’रंगपंढरीपुणे)द्वितीय – ऐश्वर्या तुपे (‘वरात’आयएमसीसीपुणे)तृतीय – ऋचा सुरवे (‘रूममेट’स्मृती थिएटर्समुंबई)उत्तेजनार्थ – दृष्टी मोरे (‘जिर्णोद्धार’नाट्यसंस्कार कला अकादमीपुणे)श्रावणी धुमाळ (‘गाऱ्हाणं’नाट्यहोलीकपुणे)हेमलता रघु (‘किटीपार्टी’नाट्यपुष्पपुणे).

उत्कृष्ट लेखन – प्रथम – ज्ञानेश विधाते (‘विषाद’रंगपंढरीपुणे)द्वितीय – संध्या कुलकर्णी (‘जीर्णोद्धार’ नाट्यसंस्कार कला अकामदीपुणे)तृतीय – मुकुल ढेकळे (‘उरूस’मुक्ताई फाऊंडेशनपुणे)उत्तेजनार्थ – स्वप्निल चव्हाण (‘टाहो’इम्पिरिकल फाऊंडेशनकल्याण)सूचित पाटील (‘मेन इन ब्लॅक’डावा क्रिएशनअलिबाग).

उत्कृष्ट पार्श्वसंगीत – राजेश देशपांडे (‘म्हँ’सृजन द क्रिएशनमुंबई). उत्कृष्ट प्रकाश योजना – ओंकार मानेदेवशिष शिंदे (‘उरूस’मुक्ताई फाऊंडेशनपुणे). उत्कृष्ट नेपथ्य – ऋतुजा बोठे (‘यशोदा’कलादर्शनपुणे).

मिलिंद हल्याळ पुरस्कृत रामचंद्र हल्याळ स्मृती सन्मानचिन्ह विशेष लक्षवेधी विनोदी कलाकार – वनमाला वैदे (‘म्हँ’सृजन द क्रिएशनमुंबई)

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading