राज्यात जेव्हा भारत जोडो यात्रा येईल तेव्हा समविचारी पक्षांना निमंत्रण देणार – नाना पटोले
पुणे : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सध्या देशभरात भारत जोडो यात्रा सुरू आहे . विरोधी पक्ष राहुल गांधी यांच्यावर सारखे टीका करत आहेत. त्यावर ती यात्रा राजकीय यात्रा नाही.आज राहुल गांधी हे पक्षासाठी नव्हे तर देशासाठी निघाले आहे.ज्यांना देशाच्या बरोबर राहायचं असेल त्यांना निमंत्रणाची गरज नाही.राज्यात जेव्हा यात्रा येईल तेव्हा जे समविचारी पक्ष आहे .त्यांना निमंत्रण देण्यात येईल.अस काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हणाले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र कार्यकर्ता मंथन शिबिराचे आयोजन काँग्रेस भवन येथे करण्यात आले होते यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या पत्रकार परिषदेला माजी आमदार दीप्ती चौधरी, माजी आमदार मोहन जोशी, अजय सिंह यादव उपस्थित होते.
ओबीसी समाजाची जातनिहाय गणना ही केंद्रानेच केली पाहिजे.राज्याने नव्हे.आज जे ओबीसी समाजाचा फुटबॉल केलं जात आहे.ते करू नये.केंद्र सरकारने जे संविधानात आहे ते केंद्र सरकारने देश भरात लागू करावं.ही मागणी महाराष्ट्र काँग्रेस ओबीसी विभागाची आहे .अस देखील यावेळी नाना पटोले म्हणाले.
काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल आहे .की औद्योगिक शेत्रात महाराष्ट्र हा गुजरात पेक्षा पुढे जाणार आहे.माझे ते अत्यंत जवळचे मित्र आहे.ते जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा 2014 ते 19 साली किती प्रोजेक्ट हे गुजरातला गेले हे त्यांनी जाहीर करावं.ते माझे मित्र असून त्याच उलट डीमोषन झाले.ते राज्याचे डीजी होते त्यांना आत्ता भाजपने डीसीपी केलं आहे.आमच्या मित्राचं अपमान हे एक प्रकारे झालं आहे.असा टोला देखील यावेळी नाना पटोले यांनी फडणवीस यांना लगावला आहे.
तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल बोलायचं काहीही कारण नाही .कारण ते आत्ता नाचगण्यात आहे.असा टोला देखील यावेळी पटोले यांनी लगावला आहे.
