सर्वसामान्यांना शिक्षण मिळू नये अशा पद्धतीचे सत्ताधाऱ्यांचे धोरण आहे -शरद पवार
पुणे: राज्यात आगामी शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ (होमवर्क) बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार सुरू आहे. याबाबत सर्वच स्तरातून राज्य सरकारवर टीका होतेय. या प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आता राज्य सरकारवर टीका केली आहे. सर्वसामान्यांना शिक्षण मिळू नये अशा पद्धतीचे सत्ताधाऱ्यांचे धोरण आहे.असं शरद पवार म्हणाले.
पुण्यातील पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोशिएशनच्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार गिरीश बापट,यामध्ये राज्यभरातील विश्वस्थ संस्था, प्रतिनिधी, वकील, धर्मदाय आस्थापनेतील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संखेने विश्वस्थ परिषदेत सहभागी होते.
राज्यात पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शाळेतून गृहपाठ देणे बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. त्यामुळे सध्या राज्य सरकारवर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. याबाबत शरद पवार म्हणाले की, सरकारने पुस्तकांवर जीएसटी लावला असंही शरद पवार म्हणाले आहेत. तसेच यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावरही टीका केली आहे. राज्यपालांनी सावित्रीबाई फुले यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचाही शरद पवारांनी दिला आहे. राज्यपाल अत्यंत वाईट भाषेत बोलले यावरुन त्यांची मानसिकता दिसते अशी टीका शरद पवारांनी केली आहे.
शरद पवार म्हणाले की, संस्था आणि धर्मादायामध्ये सुसंवाद ठेवणे गरजेचे. दिड वर्षांपूर्वी १-२ जिल्ह्याच्या लोकांसोबत बैठक घेतली त्याचा प्रचंड फायदा झाला. धर्मदाय कार्यालयाशी सुसंवाद ठेवला तर संस्थांना मोठा लाभ होतो, हे अनेकदा पाहिलेलं आहे. देवस्थानच्या मालकीचे प्रश्न वाढलेत, ते निकाली कसे काढता येतील याकडे लक्ष द्यायला हवं. कारण गावागावात जागांवरून संघर्ष पाहायला मिळतो.तो मिटायला हवा असं शरद पवार म्हणाले.
शरद पवारम्हणाले की केंद्र सरकार, राज्य सरकार, संस्था चालक आणि धर्मदाय यांच्यात सुसंवाद कसा ठेवता येईल? या दृष्टीने विचार करायला हवा. त्यावेळी संस्था आणि धर्मदाय यांच्या सर्व प्रश्नांची उकल होईल. कायमची यंत्रणा सुरू ठेवण्यासाठी आपण सर्वोतोपरी दक्षता घेऊयात. अनेकजण न्यायालयात जातात, मी त्यांना विचारलं तुम्ही न्यायालयात का जाता? तर त्यांचं म्हणणं आहे की, जो कर आमच्याकडून घेतला जातो तो आम्हाला अमान्य आहे. याबाबत त्यावर आपण तोडगा काढला तर धर्मदायचा अडकलेला निधी उपयोगात येईल असं शरद पवार यावेळी म्हणाले आहेत.
