Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी नाहीत ओबीसींचे मते लुटण्याचा काम करत आहे -नाना पटोले

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजाचे असून 2014 पासून सातत्याने भारतीय जनता पक्षाने या देशातील जनतेला आणि ओबीसी बांधवांना सांगून मत लुटली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबिसोचे पंतप्रधान आहे अस भाजपकडून सातत्याने सांगितल जात आहे.काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपूर्ण माहिती काढण्यात आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी नाही.आणि हे आम्ही देशपातळीवर जाहीर करू. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी आहे. अस सांगून ओबीसींचे मते लुटण्याचा काम करत आहे. अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.

सध्या गृहपाठवरून जे आरोप प्रत्यारोप सुरू आहे.त्यावर पटोले म्हणाले की केंद्रात आणि राज्यात जे सरकार आत्ता आहे.त्यांना सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांना शिक्षण मिळू नये अश्या प्रकारचा धोरण हे त्यांनी राबवण्याचा काम सुरू केलं आहे.आणि शिक्षण प्रणालीत मोठे बदल ते आणतील.अस देखील यावेळी पटोले म्हणाले.
नोटबंदी हा देशातील विविध जगातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. नोट बंदीच्या काळात भाजपने प्रत्येक जिल्ह्यातील जमिनीही विकत घेतल्या.आणि कार्यालय बांधले.चिवडा पार्टी ही भाजप होती. नोट बंदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर काळा पैसा हा जमा करण्यात आला. आणि त्या पैशांच्या माध्यमातून आज देशभरात राजकारण केला जात आहे.आमदारांना विकत घेतलं जातं आहे. केंद्रातील तपास यंत्रणांच्या भय आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून लोकशाही विकत घेण्याचा जो प्रकार भाजपने सुरू केला आहे.त्यावर लक्ष दिलं पाहिजे. भ्रष्टाचार आणि भय या दोन गोष्टींवर राजकारण भाजप करत आहे.अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर केली.

काल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर टीका केली याबाबत नाना पटोले यांना विचारले असता ते म्हणाले ,की ते स्वतः हा भय आणि भ्रष्टाचारामुळे तिथे गेले आहेत ते का तिथे गेले हे पहिले त्यांनी जाहीर करावं.ज्यांना काँग्रेसने मोठ केलं तेच आत्ता काँग्रेसवर बोलत असतील तर त्यांच्यावर काय बोलायचं अस देखील यावेळी नाना पटोले यांनी सांगितल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading