Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

प्रबोधनकार ठाकरे यांची ग्रंथसंपदा, कार्य आणि विचार आजही तरुणाईला प्रेरक – डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे बहुढंगी व्यक्तिमत्व हे त्या वेळच्या आणि आजच्याही समाजाला योग्य दिशेने पुढे नेणारे आहे. उत्तम छायाचित्रकार, तैलचित्रकार, शिक्षक, संपादक, वक्ते, नेते, लेखक, चरित्रकार, इतिहासकार अशी त्यांची विविधांगी ओळख महाराष्ट्राला आहे. त्यांच्या सुधारक विचारांनी महाराष्ट्रात अनेक सुधारणावादी विचार समाजात रुजले. त्यांनी सुरू केलेली प्रबोधनाची परंपरा आजही तितकीच महत्त्वाची आहे. असे प्रतिपादन आज विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे केले.

आज शिवसेना भवन, पुणे येथे त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, ‘प्रबोधनकारांनी समाजाला सुधारणेची दिशा दाखवली. वर्तमान परिस्थितीतही त्यांची उठ मराठ्या उठ ही डरकाळी प्रभावी ठरत आहे. त्यांनी लिहिलेली विपुल ग्रंथ संपदा आजही लोकप्रिय आहे. वक्तृत्वशास्त्र हे त्यांचे पुस्तक अभ्यासक्रमात ठेवण्याचा आग्रह लोकमान्य टिळकांनी धरला होता.’

यावेळी शिवसेनेचे पुणे शहर संपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, उपशहर प्रमुख प्रशांत राणे, राजेंद्र शिंदे, नगरसेविका संगीता ठोसर, पल्लवी जावळे, कल्पना थोरवे, संतोष गोपाळ, उमेश वाघ, रमेश देसाई, नितीन पवार, नितीन शिंदे, प्रवीण डोंगरे, मनीष बासू, सुनील जगताप, संजय वाल्हेकर, प्रशांत चांदेरे, राहुल शेंडगे, मिलिंद पत्की, विधानसभा संघटक जितेंद्र निजामपूर, नितीन दलभंजन, किशोर रजपूत, सूरज लोखंडे,
महीला आघाडीच्या हेमलता परदेशी, युवा सेनेच्या मनीषा गरुड, रेणुका साबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading