प्रत्येक रहस्य कधी ना कधीतरी उलगडतंच !जाणून घेऊया ‘ व्हिक्टोरिया ‘ चे रहस्य ..
ती आणि ती , वेल डन बेबी चित्रपटाच्या यशानंतर आनंद पंडित मोशन पि्चर्स एल एल पी आणि गुसबम्प्स एंटरटेनमेंट पुन्हा एकदा एक नवीन चित्रपट घेवून येत आहेत .
पुष्कर जोग , सोनाली कुलकर्णी व आशय कुलकर्णी यांची प्रमुख भमिका असलेल्या ‘व्हिक्टोरिया’ या चित्रपटाचे बहुतांश शूटिंग स्कॉटलंड मध्ये झालेले आहे . हीरा सोहल ही अभिनेत्री पदार्पण करत आहे . जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी हे दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत . या चित्रपटाची कथा , पटकथा व संवाद ओमकार गोखले , जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी यांनी लिहिले आहेत.
तसेच अभिनेता पुष्कर जोग यांचा सोनाली कुलकर्णी सह हा तिसरा चित्रपट आहे , या पूर्वी ती आणि ती , तमाशा लाईव हे दोन चित्रपट त्यांनी केले आहेत . आनंद पंडित , रूपा पंडित आणि पुष्कर जोग हे या चित्रपटाचे निर्माते आहेत , वैशल शाह हे सह निर्माता आहेत .
