fbpx
Thursday, May 9, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

पाषाण -सूस सेवा रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा* चंद्रकांत पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना

सूसमधील गार्बेज प्लांटची भिंत आत घेऊन वाहतूक कोंडी सोडवा

पुणे : सूस खिंडीतील गार्बेज प्लांटची भिंत आत घेऊन वाहतूक कोंडी सोडवा, तसेच सेवा रस्ता जलदगतीने पूर्ण करा, तसेच पाषाण सूस उड्डाणपुलासाठी अधिग्रहण केलेल्या जागेचा मोबदला तातडीने आदा करा, आदी सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत  पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

पाषाण -सूस मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या सूस खिंड उड्डाणपुलाची पाहाणी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज करुन आढावा घेतला. तसेच स्थानिक नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, राजेंद्र मुठे, वाहतूक शाखेचे श्रीनिवास बोनाला राष्ट्रीय महामार्गाचे संजय कदम, अधिकारी, स्थानिक नगरसेवक अमोल बालवडकर, ज्योती कळमकर, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

पाषाण -सूस मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेच्या वतीने सूस खिंड उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत असून, या उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास येत असले, तरी सेवा रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण आहे. त्यासोबतच सूस भागातील गार्बेज प्लांटच्या भिंतीमुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे आज नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सदर उड्डाणपुलाची पाहाणी केली. यावेळी स्थानिक नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत नामदार पाटील यांना अवगत केले.

यावर पाटील यांनी नागरिकांच्या अडचणी तातडीने दूर करुन; त्यांचे जीवन सुसह्य करण्याच्या सूचना यावेळी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या. यात प्रामुख्याने सेवा रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करणे, तसेच गार्बेज प्लांटची भिंत मागे घेऊन रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवणे, त्याचप्रमाणे उड्डाणपुलासाठी अधिग्रहित केलेल्या जमीन मालकांना त्याचा मोबदला तातडीने आदा करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading