Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या पुण्यातील मानाच्या गणपतीसह विविध गणेश मंडळाना भेटी

पुणे:दोन वर्षानंतर राज्यात गणपतीचा उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. सामान्य नागरिक ते वेगळ्या पक्षातील नेते वेगवेगळ्या मंडळांना भेट देऊन आरती व भेट देत आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेश मंडळांना भेट देण्यासाठी आज पुणे दौऱ्यावर आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम, मानाचा चौथा गणपती तुळशीबाग, अखिल मंडई मित्र मंडळ, मानाचा पाचवा केसरी वाडा या वं शहरातील विविध मंडळाचे दर्शन घेतले.
त्यांच्याबरोबर आरोग्य मंत्री तानाजी सावंत ,किरण साळी व शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
एकनाथ शिंदे म्हणाले,गणेशाचा साजरा होत आहे तर गणेशोत्साला सर्वांना शुभेच्छा आणि गणपती मध्ये कोणते अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी घ्या आणि हा गणेशोत्सव निबंध मुक्त आहे सर्वांनी गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करावा अशा शुभेच्छा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading