fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsPUNE

पं. शिवकुमार शर्मा यांना ‘अर्घ्य’द्वारे युवा कलाकारांची सांगीतिक श्रद्धांजली

पुणे : पुणे फेस्टिवल अंतर्गत ‘अर्घ्य’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून जगविख्यात संतूरवादक स्व. पं. शिवकुमार शर्मा यांना युवा कलाकारांनी सांगीतिक श्रद्धांजली वाहिली. निनाद दैठणकर यांच्या संतूरवरील विविध रचना आणि त्यांना रोहित मुजुमदार यांनी दिलेल्या तबल्याच्या साथीने रसिकांना मंत्रमुग्ध केले.

34 व्या पुणे फेस्टिवल अंतर्गत कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये ‘अर्घ्य’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. धनंजय दैठणकर यांचे सुपुत्र आणि शिष्य निनाद दैठणकर आणि तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांचे शिष्य रोहित मुजुमदार यांच्या संतूर आणि तबल्याच्या जुगलबंदीने रसिक भारावून गेले.

निनाद दैठणकर यांनी पहिल्या भागात राग किरवाणी सादर केला. त्यामध्ये त्यांनी आलाफ, जोड, झाला व 3 रचना पेश केल्या. तसेच विलंबित रुपक व मध्य आणि द्रुत तीन तालमध्ये रचना सादर केल्या.

दुसऱ्या भागात त्यांनी उपशास्त्रीय सादरीकरण केले. त्यामध्ये त्यांनी राग मिश्र पहाडीमध्ये धून सादर केली. कार्यक्रमाची सांगता भैरवी मधल्या रचनेने झाली.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे सांस्कृतिक प्रमुख अतुल गोंजारी यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading