Monday, June 22, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

कॉर्पोरेट जगतातील एक तेजस्वी तारा आम्ही गमावला – शरद पवार

पुणे : उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. ते टाटा ग्रुपचे माजी चेअरमन होते. त्यांच्या अपघातामुळे उद्योगविश्वाला मोठा धक्का बसला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांनी पण श्रद्धांजली वाहिले आहे. शरद पवार म्हणाले, , टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अकाली निधनाची धक्कादायक बातमी ऐकून खूप दुःख झाले. ते एक प्रतिभावान आणि हुशार उद्योजक होते. कॉर्पोरेट जगतातील एक तेजस्वी तारा आम्ही गमावला. देशाच्या विकासात सायरस मिस्त्रीच मोलाचं योगदान होतं.

शरद पवार म्हणाले की ,देशाच्या आणि विशेषतः हा महाराष्ट्राच्या उभारणीसाठी पारशी समजातील अनेकांचं फार मोठं योगदान आहे. त्या योगदान देणाऱ्या लोकांच्या यादीत मिस्त्री ग्रुप हा अत्यंत महत्त्वाचं काम करणार ग्रुप आहे.यांनी सुरवातीला टाटांच्या समवेत खूप मोठं काम केलं.एक काळ असा होता की टाटांच्या ग्रुप मध्ये टाटा पेक्षा जास्त गुंतवणूक मिस्त्री ग्रुप ची होती.नंतर रतन टाटा यांनी आपल्या पदातून मुक्तीचा निर्णय घेतला.त्या निर्णयानंतर टाटा ग्रुप च नेतृत्व सायरस मिस्त्री यांच्याकडे गेलं.आणि ते अध्यक्ष झाले .अतिशय बारकाईने ते काम करत होते दुर्दैवाने त्यांच्यात काही मतभेद झालं आणि त्यांना तो ग्रुप सोडावं लागलं. असा असताना त्यांनी टाटा मधून राजीनामा दिला आणि ती आपल्या कामाला लागले.

सायरस मिस्त्री हे अत्यंत सुस्वाभावी आणि कमीत कमी बोलणारे ग्रस्त होते.कुठेही कटुता असणार नाही.याची काळजी ते नेहेमी घेत असत.मिस्त्री कुटुंबातील नवीन पिढीचे ते अत्यंत कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व होते.त्यांचं निधन म्हणजे देशातील तसेच राज्यातील औद्योगिक क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या व्यक्तींसाठी मोठ्या प्रमाणात धक्कादायक बाब आहे.हा अपघात काहीतरी शिकवत आहे.चांगले रस्ते हे जमेचे बाजू आहे.पण चांगले रस्ते म्हणून गाडीच्या वेगावरच्य नियंत्रणा संबंधी कुठेतरी विचार करण्याची वेळ आली आहे.अस यावेळी पवार म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading