Monday, June 22, 2026
BusinessLatest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

प्रसिद्ध उद्योजक सायरस मिस्त्रींचा अपघाती मृत्यू

मुंबई – टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे आज अपघाती निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. पालघरमधील चारोटी येथे हा अपघात घडला. दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारासा सूर्या नदीवरील पुलावर दुभाजकाला कार आदळून हा अपघात झाल्याचं समजत आहे. अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती मिळत आहे.

अपघातात दोघे जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला बोलताना दिली आहे.

पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, “दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास अहमदाबाद येथून मुंबईला जाणाऱ्या मार्गावर सूर्या नदीच्या पुलावर हा अपघात झाला. अपघातात दोन जखमी झाले असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. ही मर्सिडीज कार होती. गाडीचा क्रमांक MH-47-AB-6705 असा आहे. पुढील प्रक्रिया सध्या सुरु आहे”. दुभाजकाला गाडीने धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading