राष्ट्रीय समाज पक्षाला कॅबिनेट मंत्रीपद देण्यात यावे – महादेव जानकर
पुणे: राज्यात सत्तांतर घडून शिंदे-फडणवीसांचे सरकार स्थापनझाले आहे. सरकारमधील काही आमदारांचे मंत्रिपदी वर्णी लागली. खाते वाटपही पार पडले. विशेष म्हणजे या संपूर्ण मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे विरोधी पक्ष सतत टीका करत आहेत.
मित्र पक्षांनाही यामध्ये स्थान दिले नाही. यामुळे मित्र पक्षात नाराजी उफाळून आली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी आपल्या पक्षाला कॅबिनेट मंत्रीपद देण्यात यावे. अशी मागणी
दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी केली.
महादेव जानकर यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावरही भाष्य केले आहे. पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. नुकतीच राष्ट्रवादीने त्यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली होती. जानकर यांनी यावरही प्रतिक्रीया दिली आहे. पंकजा मुंडे कोणत्याही पक्षात जाणार नाहीत. त्यांच्या वडिलांचं आयुष्य भाजपमध्ये गेलं. त्यांचंही गेलं आहे. त्या भाजपमध्येच राहणार. कुठेही जाणार नाहीत. भाजप सोडणार नाहीत. ऊन-पाऊस सर्वच पक्षात सुरू असतो. असं महादेव जानकर म्हणाले.
