Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

Pune – सुरेश कलमाडी यांच्या कार्यक्रमाला भाजपचे बडे नेते उपस्थित राहणार

पुणे : पुण्याच्या राजकारणात एकेकाळी सबसे बडा खिलाडी असणारे काँग्रेसचे माजी नेते सुरेश कलमाडी यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजपशी जवळीक वाढवण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे.
त्यामुळे आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि कलमाडी यांची हातमिळवणी होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. यासाठी निमित्त ठरला आहे तो. सुरेश कलमाडी यांचा पुणे फेस्टिव्हल. या सोहळ्याचे शुक्रवारी उद्घाटन होणार आहे. पुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटनासाठी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि मंगलप्रभात लोढा, हे बडे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पुण्यात कलमाडी आणि भाजपच्या जवळकीची चांगलीच चर्चा रंगली आहे.
भाजप नेत्यांच्या उपस्थितीने चर्चाना खऱ्या अर्थाने उधाण आलं आहे. भाजपचे दिग्गज नेतेमंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कलमाडी आणि भाजपची जवळीक वाढली आहे का ? असा प्रश्न निर्माण झालाय.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading