Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

नाना पटोले आणि विश्वजित कदम यांनी केली कसबा गणपतीची आरती

पुणे: दोन वर्षानंतर राज्यात गणपतीचा उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. सामान्य नागरिक ते वेगळ्या पक्षातील नेते वेगवेगळ्या मंडळांना भेट देऊन आरती करत आहेत. आज पुण्यात पहिला मानाचा गणपती कसबा गणपती
याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी भेट देऊन आरती केली.
यावेळी पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, संगीता तिवारी, माजी अध्यक्ष रमेश बागवे, गोपाळ तिवारी, माझी महापौर कमल व्यवहारे, माजी आमदार दीप्ती चौधरी, नगरसेवक आबा बागुल, केतन जाधव पुणे शहरातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते , कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे  व मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading