Saturday, May 9, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

ईडी म्हणजेच किरीट सोमय्या आहे का -संजय निरुपम

पुणे:ज्याप्रकारे किरीट सोमय्या विरोधी पक्षांच्या लोकांचे ईडी द्वारे घोटाळे बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात त्यानुसार ईडी म्हणजेच किरीट सोमय्या आहे का. अशी टीका काँग्रेस नेते माजी खासदार संजय निरुपम यांनी केली आहे .
त्याचबरोबर ईडी ही भारतीय जनता पार्टीची एक संघटन आहे याप्रमाणे युवा संघटन महिला संघटन असतं .त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे एक स्वतंत्र संघटना असल्याचे म्हणत संजय निरुपम यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका केलेली आहे.
आज काँग्रेसचे नेते संजय निरुपम काँग्रेसच्या सरचिटणीस संगीता तिवारी यांनीकाँग्रेस भवन येथे महिला बचत गटांचे विविध गणेशोत्सवांमधील डेकोरेशनचे तसेच महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. त्या प्रदर्शनाला प्रमुख पाहुणे म्हणून संजय निरुपम आज उपस्थित होते.
तेव्हा त्यांनी विविध मुद्द्यांवर प्रसार माध्यमांची संवाद साधला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाब नबी आझाद यांनी काल काँग्रेसला राजीनामा दिला आहे .त्यावर संजय निरुपम म्हणाले,गुलाम नबी आझाद यांना पक्षांना सर्व काही दिले .त्यानंतर त्यांना खासदारकी नाही मिळाली. आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडोनी अभियानाला कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न यातून. आझाद यांनी केलेल आहे त्यामुळे आझाद यांनी अशावेळी पक्ष सोबत थांबणं आवश्यक होतं .पक्षांनी त्यांना सर्व काही दिलं गुलाब नबी आझाद यांचीओळख ही काँग्रेस पक्षामुळेच आहे ‌. असे संजय निरुपम म्हणाले.
देशात वेगवेगळ्या मुद्द्यावर बोलणारे कोणीही नाही .एकटे राहुल गांधी बोलत आहेत .आणि राहुल गांधीच्या यांच्या नेतृत्वात काँग्रेस लढत आहे. त्यामुळे आझाद यांनी यावेळी काँग्रेस सोबत राहणार आवश्यक होतं .भारत जोडो हे सध्या महत्त्वाचा आहे. कारण देशात अस्थिर वातावरण असल्याचे संजय निरूपम म्हणाले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading