भोसरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे यांची पुणे न्यायालयात 15 सप्टेंबरला सुनावणी
पुणे:राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. एकनाथ खडसे यांच्यावर आरोप असलेल्या भोसरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी नव्याने तपासासाठी लाचलुचपत विभागाने न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर पुणे न्यायालयात आता १५ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.
भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांचा तत्कालिन महाविकास आघाडी सरकारकडे लाचलुचपत विभागाने क्लोजर रिपोर्ट पाठवला होता. परंतु, राज्यात नव्याने शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर लाचलुचपत पुणे विभागाने भोसरी भूखंड घोटाळ्याची पुन्हा चौकशी करण्याच्या मागणीची मागणी केली आहे. यासंदर्भात अर्ज दाखल केला असून पुणे न्यायालय १५ तारखेला सुनवणी करणार आहे. यामुळे भोसरी भुखंड घोटाळ्यात न्यायालय काय निर्णय देते याकडे राज्याचे लक्ष आहे.
