मी जास्त बोलणार नाही, पण ज्यादिवशी बोलेन, त्यावेळेस गदारोळ माजेल तानाजी सावंत यांचा राष्ट्रवादीला इशारा
पुणे : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत आजपासुन दोन दिवस पुणे जिल्हा दौऱ्यावर आहेत. मंत्री तानाजी सावंत यांच्या पुणे दौऱ्यात एकही सरकारी कार्यक्रम नाही. त्यामुळे तानाजी सावंत यांच्या पुणे दौऱ्यावरून विरोधाकांकडून टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे यांनीही तानाजी सावंत यांच्या पुणे दौऱ्यावरून निशाणा साधला आहे.
हेच अडाणी लोक महाराष्ट्राचे वाटोळे करणार आहेत. असा खोचक टोला राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी मंत्री तानाजी सावंत यांना लगावला आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पण तानाजी सावंत यांच्यावर निशाणा साधला आहे. पण त्यालाच प्रत्युत्तर आज आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिले आहे.
तानाजी सावंत म्हणाले,ट्रोल सुरूय, ते चुकीचं आहे. ट्रोल करणारे लोक काय म्हणतात त्याच्याशी मला काही देणंघेणं नाही. मी जास्त बोलणार नाही, पण ज्यादिवशी बोलेन, त्यावेळेस गदारोळ माजेल,’ असा इशारा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीला दिला आहे.
शिंदे गटाचे आमदार व राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे आज पुणे पोलीस आयुक्त येथे पुणे शहरातील रस्त्यांच्या दूर अवस्था संदर्भात भाजपचे आमदार व उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आयोजित बैठकीत उपस्थित लावली. तेव्हा त्यांनी प्रसार माध्यमांची संवाद साधला.
तानाजी सावंत म्हणाले,पुण्यामध्ये माझा राखीव वेळ होता. मी कुठलीही गाडी मागितली नव्हती. शासकीय ताफ्यांच्या मी विरोधात आहे. माझ्या कॉलेजचं आणि मतदारसंघातील लोकांचं आज दिवसभर काम मी करत होतो. पण राजकीय विरोधकांनी 1 किमीचा दौरा होता, डीव्ही कार पाहिजे असं सांगितलं. माझ्या स्वतःच्या गाड्या आहेत. मी प्रोटेक्शन देखील टाळतो. कारण शासनावरती ताण येऊ नये म्हणून. सध्या जनतेला प्रोटेक्शनची गरज आहे. असं तानाजी सावंत म्हणाले.
आता दहा दिवसाचे गणपती येत आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी मी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ते लोकं मला ट्रोल करत आहेत, हा त्यांचा मागच्या दहा- पंधरा दिवसांपासूनचा कार्यक्रम आहे. पण माझ्या वरिष्ठांनी मला सांगितलं आहे त्यांना प्रतिसाद देऊ नका. काही बोलू नका. असे तानाजी सावंत म्हणाले.
