Tuesday, May 5, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे स्मारक झाले पाहिजे – रामदास आठवले

पुणे : दलीत पँथर ही अन्याय अत्याचार विरोधी आणि दलितासाठी काम करणारी चळवळ होती .ती जगभरात पोहचली होती . चळवळ फुटली नसती आणि एकसंध राहिली असती तर महाराष्ट्रात पँथर चे सरकार आले असते असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले म्हणाले ते आज पुण्यात दलीत पँथर च्या सुवर्णमहोत्सव वर्षा निमित्त आयोजित पँथर सन्मान पुरस्कार सोहळा त्यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी ते बोलत होते .
पुढे ते म्हणाले की पँथर ने नामांतर लढा , गायरान जमीन हक्क लढा ,मंडल आयोग प्रश्न ,शहरातील झोपड्यांना आधार ,दलीत, आदिवासी यांच्यासाठी विविध मोर्चा आंदोलन तसेच यासारखे कितीतरी आंदोलने आणि लढे पँथर ने त्याकाळी उभारले होते .त्यामुळे पँथर ही दलीत समाजाची खरी शक्ती होती .
दलीत पँथर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पँथर सन्मान पुरस्कार रामदासजी आठवले यांच्या हस्ते समारंभ झाला .यावेळी दिवंगत माजी उपमहापौर पँथर नवनाथ कांबळे ,रवींद्र गांगुर्डे ,चिंतामण कांबळे यांना दिवंगत पुरस्कार त्याचबरोबर पँथर चळवळीत योगदान देणारे भगवान वैराट,बाबुराव घाडगे ,वसंत बनसोडे प्रतिभाताई गायकवाड, यासह पँथर चळवळीत विशेष योगदान देणाऱ्या पँथर कार्यकर्त्यांना पँथर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
यांनतर ज्येष्ठ साहित्यिक व दलीत पँथरचे संस्थापक सदस्य अर्जुन डांगळे मनोगतात म्हणाले की दलीत पँथर चा झांजावात बघून मला आफ्रिकेत बोलावून प्रत्यक्ष नेल्सन मंडेला यांनी त्यावेळी सत्कार केला होता . तो सन्मान माझा नसून पँथर कार्यकर्त्यांचा होता . ही चळवळ इतकी मोठी झाली होती की देशात नाहीतर आफ्रिका ,अमेरिका सह जगभरात पोहचली होती .
पुढे डांगळे म्हणाले की , पँथर जगातील अशी एकमेव चळवळ होती की जी लेखकांनी उभारली होती .या चळवळीचे नेतृत्व लेखक कवी साहित्यिक करीत होते . माजी मंत्री चंद्रकात हांडोरे. म्हणाले की आज ही पँथर पुन्हा उभारू शकते . सर्वांनी आपल्या चुका दूरस्त करून दलीत समाजाच्या विकासाठी आणि प्रश्नासाठी एकत्र येऊन लढा उभारला पाहिजे .
या कार्यक्रमास दिलीप जगताप , सुखदेव सोनवणे ,परशुराम वाडेकर ,रोहिदास गायकवाड ,  शैलेश चव्हाण ,बाळासाहेब जानराव , शैलेंद्र मोरे ,आयुब शेख ,महिपाल वाघमारे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परशुराम वाडेकर यांनी केले तर आभार शैलेश चव्हाण यांनी मानले .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading