‘काय ते डोंगर, काय ती हिरवळ ..’ वळसे पाटील यांच्या डायलॉगची सोशल मीडियावर चर्चा
पुणे : काय ते डोंगर, काय ती झाडी… सगळं कसं ओके या शहाजी बापूंच्या डायलॉगने सर्वांनाच भुरळ घातली होती. एवढंच काय त्या डायलॉगवर गाणे देखील आले आहेत. आता या डायलॉगची भुरळ महाविकास आघाडीच्या नेत्यांना देखील पडल्याचे पाहायला मिळत आहे. आंबेगाव येथे एक कार्यक्रमासाठी दिलीप वळसे पाटील आले असता त्यांनी सभोवतालचा परिसर पाहून ‘काय ते डोंगर, काय ती हिरवळ ..’ हा डायलॉग म्हटंलाटा. ज्याची चर्चा आज सोशल मीडियावर आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमावेळी शिवाजीराव आढळराव पाटील- दिलीप वळसे पाटील एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.
आंबेगाव तालुक्यातील एकलहरे येथे शामादार बाबा डोंगराच्या पायथ्याशी स्व.शांताराम थोरात या कुटुंबीयांनी उभारलेल्या प्रवेशद्वार उद्घाटन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र सर्व बाजूने हिरवळ, डोंगर पाहून त्यांना सुद्धा राहवले नाही. शेवटी त्यांनी देखील म्हटले “काय ते डोंगर, काय ती हिरवळ, सगळं कसे ओके”, हा डायलॉग आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे.
एकलहरे परिसरात डोंगरावर असलेल्या शामादार बाबा देवस्थान जीर्णोद्धार सोहळा व अन्य विविध विकास कामांचा उद्घाटन समारंभ वळसे पाटील व शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते झाला.
यावेळी वळसे पाटील म्हणाले ‘गावकऱ्यांनी लोक वर्गणीतून शामादार बाबा मंदिराचा जीर्णोद्धार केला असून गावकऱ्यांच्या माध्यमातून राबवला गेलेला गा आगळावेगळा कार्यक्रम खरच कौतुकास्पद आहे. या कार्यक्रमासाठी शिंदे गटात दाखल झाले माजी खासदार शिवाजीराव आढळराव देखील उपस्थित होते. वळसे पाटलांच्या या डायलॉग मुळे त्यांना देखील हसू आवरले नाही. त्यांनी देखील भाषांना दरम्यान विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल.असे आश्वासन त्यांनी दिले.
