पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर
राज ठाकरे उद्या नवी पेठेतील मनसे पक्ष कार्यालय येथे मनसे सभासद नोंदणीला होणार सुरुवात
पुणे : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर हिप बोनची शस्त्रक्रिया झाल्या नंतर हे तब्बल दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर राजकारणात पुन्हा सक्रिय झाले आहेत. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर येणार आहेत. उद्या ते त्यांच्या पुण्यातील मनसे पक्ष कार्यालयात मनसे सभासद नोंदणीची सुरुवात करणार आहेत.
मागच्या आठवड्यात राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना. त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मनसेचे नेते राज ठाकरे व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे परत एकत्र येणार का? असा प्रश्न सगळेजण विचारत आहे. त्यावर नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.उद्धव राज हे दोन्ही भाऊ एकत्र यावर त्याची साद आली तर पाहू. अशि प्रतिक्रिया दिली होती. त्यावर मनसे – शिवसेना एकत्र येणार का? यावर पुण्यात माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया देतायेत का ? याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.
