Friday, May 15, 2026
BusinessLatest News

गोखले कंस्ट्रक्शन्सच्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण

पुणे : शहरातील मोक्याच्या ठिकाणी उत्तम दर्जाच्या व्यावसायिक आणि निवासी संकुलांची निर्मिती करण्यात अग्रेसर असलेल्या गोखले कंस्ट्रक्शन्स या बांधकाम समूहातर्फे नुकतेच आपल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. हे नवीन बोधाचिन्ह कंपनीच्या ग्राहकाभिमुखता, व्यवसायाप्रती असेलली कटीबद्धता व गुणवत्ता या मूळ धोरणांशी सुसंगत असे साधे सोपे असण्याबरोबरच वैश्विक विचारसरणी आणि प्रगतीशिलता दर्शवणारे आहे. २००४ साली बांधकाम व्यवसायात पदार्पण केलेल्या गोखले कंस्ट्रक्शन्सने आजवर पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात १७५ प्रकल्प पूर्ण करत सुमारे ५००० हून अधिक आनंदी कुटुंबांना आपल्या स्वप्नातील घर दिले आहे.  गोखले कंस्ट्रक्शन्सतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रकल्पांमध्ये सध्या निवासी आणि व्यावसायिक क्षेत्रात मिळून ४० लाख चौरस फूट बांधकाम शहराच्या विविध भागात सुरु आहे.

भविष्यातील योजनांविषयी माहिती देताना गोखले कंस्ट्रक्शन्स’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विशाल गोखले म्हणाले, “सध्या सुरु असलेल्या प्रकल्पांशिवाय येत्या दोन वर्षात सुमारे १५ लाख चौरस फुट इतके बांधकाम असणारे निवासी प्रकल्प तर १० लाख चौरस फुट इतके बांधकाम असणारे व्यापारी संकुले निर्माण करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. याबरोबरच पुणे शहराव्यातिरिक्त इतर शहरांमध्ये व्यवसाय विस्तार तसेच बांधकाम व्यवसायाशी संलग्न व इतर व्यवसायात पदार्पण आदी बाबी देखील विचाराधीन आहेत.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading