Thursday, May 7, 2026
Latest NewsPUNE

पुणे व्यापारी महासंघाची निवडणूक बिनविरोध

पुणे: पुणे शहरातील विविध प्रकारच्या ८२ व्यापारी संघटनाची शिखर संघटना असलेल्या पुणे व्यापारी महासंघाची निवडणुक दि. ३० जुलै २०२२ रोजी जाहीर करण्यात आली होती. निवडणूक प्रक्रिया सोमवार दि. २२ ऑगस्ट २०२२ रोजी हॉटेल शांताई येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅडव्होकेट  देविदास साळी यांनी निवडणुकीचा निर्णय जाहीर केला. 

सन २०२२ – २०२५ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी अध्यक्ष  फतेचंद रांका, उपाध्यक्ष  सुर्यकांत पाठक, उपाध्यक्ष  नितीन काकडे, उपाध्यक्ष  अरविंद कोठारी, सचिव  महेंद्र पितळीया, सहसचिव राहुल हजारे, सहसचिव  यशस्वी पटेल, सहसचिव मिलिंद शालगर व खजिनदार पदी   बॉबी मैनी, सहखजिनदार  प्रमोद शहा हे निवडून आले.
कार्यकारिणी सदस्य म्हणून   सुरेखा सांडभोर,  सतीशचंद्र रहेजा,  मनोज सारडा,  मिठालाल जैन,  हेमंत शहा ,   मनीष परदेशी,  किशोर ओसवाल , जयंती जैन,  कल्पेश शहा,  घनश्याम सुराणा,  आशिष जैन हे निवडून आले.
पुणे व्यापारी महासंघाची स्थापना १९९४ साली झाली असून आजपर्यंत सेल्स टॅक्स, व्हॅट, एल.बी.टी.च्या जाचक कायदयाविरोधात यशस्वी लढा दिला आहे. जी.एस.टी. साठी व्यापाऱ्यांचे अनेक मेळावे घेण्यात आले. कोरोना काळात व्यापाऱ्यांची भूमिका शासनास पटवून देऊन व्यवसाय पुर्ववत करण्याचे कार्य पथदर्शी राहिले आहे. तसेच कोरोनाच्या प्रतिबंधासाठी व्यापारी व कर्मचारी यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
फतेचंद रांका हे पुणे सराफ असोसिएशन, महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशन, जैन गोडवाड संघ, लायन्स क्लब ऑफ पुणा सारसबाग चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष असून अनेक सामाजिक संस्थावर कार्यरत आहेत.
या निवडीनंतर सभासदांना मार्गदर्शन करतांना  फतेचंद रांका यांनी आपण सर्व व्यापाऱ्यांनी एकत्रित येऊन व्यवसाय करणे ही सद्याच्या काळाची गरज आहे व व्यवसाय वाढीसाठी अनेक प्रकारच्या कार्यशाळा घेवून पुणे शहराला एक व्यापाराचे प्रमुख केंद्र करण्याचा मानस आहे असे आपल्या भाषणात नमुद केले.
महेंद्र पितळीया यांनी आपण व्यापाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढत राहू पण यासाठी आपण सर्वांनी एकजूट राहणे आवश्यक आहे असे नमुद केले.
​याप्रसंगी विविध संघटनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading