Sunday, September 6, 2026
Latest NewsPUNE

राजीव गांधी यांनी तंत्रज्ञानाच्या विकासातून देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी मोलाचे योगदान दिले -श्रीरंग चव्हाण पाटील

पुणे: माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासातून देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे.असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग चव्हाण पाटील यांनी केले आहे. स्व. राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त धायरी येथे खडकवासला काँग्रेसच्या वतीने अभिवादन करण्यात आले . चव्हाण पाटील यांच्या हस्ते स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली.
या वेळी उपस्थित वृक्ष संवर्धन समितीचे माजी सदस्य मिलिंद पोकळे,पुणे जिल्हा शहर पर्यावरण विभाग उपाध्यक्ष धनंजय पाटील, सादबा नाना पोकळे, राजेश पोकळे,भिकाजी कोकाटे, शिवजी पोकळे,अनिकेत देशमुख, अंबादास बिरादार,आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading