देशात प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा आणि मागणी करण्याचा अधिकार आहे -चंद्रकांत पाटील
पुणे : 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून खासदारकी द्या, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहून केली आहे. त्यावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा आल्या आहेत. यावर आता चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशात प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा आणि मागणी करण्याचा अधिकार आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, की देवेंद्र फडणवीस जातीपातीच्या आधारे नाही. तर त्यांच्या स्वतःच्या कर्तुत्वावर इतके वरती आले आहेत.
सरकारी नोकऱ्यांत पाच टक्के आरक्षण दिले जाईल, ही घोषणा आणि राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय केवळ काही शहरातील महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून घेतला आहे, असा आरोप एमपीएससी समन्वय समितीच्या विद्यार्थ्यांनी केला. त्यावर भाजपचे नेते व माजी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्रात क्रीडा प्रकारांसाठी 5 टक्के नोकऱ्यांमध्ये आरक्षण हे आधीपासून आहेच. आरक्षण हे असतात एक तर उभ आणि दुसरं अडवा आरक्षण. उभ आरक्षण हे देताच येत नाही. कारण हे उभ आरक्षण हे 50 टक्केच्या वर जाता येत नाही. त्यामुळे खेळातील जो 5 टक्के आरक्षण आहे त्या 5 टक्के अस्तित्वात असलेल्या खेळाडूंसाठी च्या नोकरीच्या आरक्षणमध्ये दहीहंडी हा खेळ जोडण्यात आला आहे. हे आरक्षण नव्याने देण्यात आलेलं नाही तर आहे त्याच आरक्षण मध्ये हा नवीन खेळ जोडण्यात आला आहे, असे स्पष्टीकरण पाटील यांनी दिले.
