Tuesday, May 5, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

डॉ. ज्योती मेटे यांना भाजपाने विधान परिषदेवर संधी द्यावी – शिवसंग्राम संघटना 

पुणे : मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते व शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार विनायक मेटे यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांना भाजपाने राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर संधी द्यावी. तसेच त्यांना सत्तेत सहभागी करून घ्यावे अशी  मागणी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

शिवसंग्रामच्या वतीने आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप नेतृत्वाकडे शिवसंग्राम लवकरच भेटून यांमदर्भात लेखी मागणी करणार असल्याची माहिती आज पुण्यातील पत्रकार परिषदेत शिवसंग्राम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तानाजी शिंदे यांनी दिली.

यावेळी प्रदेश सरचिटणीस विक्रांत आंब्रे, प्रदेश युवक अध्यक्ष उदयकुमार आहेर, प्रदेश सचिव शेखर पवार, प्रदेश प्रवक्ते तुषार काकडे, प्रदेश उपाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग कल्याण आडगळे, पुणे शहराध्यक्ष शभरत लगड, पुणे शहर महिला अध्यक्ष कालिंदी‌ गोडांबे, पुणे शहर सामाजिक न्याय विभाग श्विनोद शिंदे आदी उपस्थित होते.

तानाजी शिंदे म्हणाले, विनायक मेटे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात शोकसभा सुरू आहेत. 24 ऑगस्टला मुंबई येथे शिवसंग्रामच्या नेत्या डॉक्टर भारतीताई लव्हेकर यांनी आंध्रांजली सभेचे आयोजन केले असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच विरोधी पक्ष नेते अजित पवार यावेळी उपस्थित राहणार आहेत. विनायक मेटे यांच्या अपघात संदर्भात शासनाने चौकशीचे आदेश दिलेले आहेत. याचबरोबर सीआयडी चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. ती चौकशी नी पक्षपातीपणे व लवकरात लवकर केली पाहिजे, अशी आमची मागणी आहे.

दरम्यान, विनायक मेटे यांचा दुखवटा कालावधी संपल्यावर लवकरच राज्य कार्यकारिणीची बैठक बोलावली जाणार असून त्यामध्ये शिवसंग्राम ची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. त्यावेळी योग्य ते निर्देश सर्व जिल्हा अध्यक्ष यांना देण्यात येतील. सदर कार्यकारणी बैठक होईपर्यंत कोणत्या जिल्ह्यातील पदाधिकारी अथवा कार्यकर्ते यांनी कोणत्या प्रकारची पत्रक बाजी करू नये .वा कुठे कसलेही स्टेटमेंट करू नये. संघटनेच्या शिस्तीत राहून वर्तन असावे. याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन तानाजी शिंदे यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading