शिंदे गट मोठ्या दहीहंडीचे आयोजन करून शक्तिप्रदर्शन करणार
पुणे: महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. विविध पक्षातील नेत्यांकडून दरवर्षी राज्यभरात दहीहंडीच्या जंगी कार्यक्रमांचे आयोजन करून शक्तिप्रदर्शन करण्यात येते.
निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. यात राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमधील महापालिका निवडणुकांचा समावेश आहे. पुणे महापालिकेची निवडणूक देखील होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षातील नेत्यांनी तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. आता शिंदे गटाच्या वतीने पुणे शहरात सर्वात मोठ्या दहीहंडीचे आयोजन करून शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला शिंदे गटातील दिग्गज नेते मंत्री तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, आमदार शहाजी पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची उपस्थिती असणार आहे.
