Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त आजी-माजी सैनिकांचा सत्कार संपन्न

पुणे : बोपोडी येथे पुण्याच्या मा. उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर यांच्या वतीने भारतीय संघराज्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर आज स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रभागात विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.संध्याकाळी पाच वाजता देशभक्तीपर गीतांच्या ऑर्केस्ट्रातून देशातील वीर जवान,हुतात्म्यांना आदरांजली देण्यात आली.
या कार्यक्रमात भारतीय सैन्य अधिकारी प्रशिक्षण केंद्र चेन्नई येथून नव्याने पास आऊट झालेल्या प्रभागातील राष्ट्रीय खेळाडू लेफ्टनंट  पार्थ जगताप आणि सेवानिवृत्त सेनाधिकारी सुभेदार शिवाजी शिंदे यांचा स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास मा.उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर, रिपाई नेते  परशुराम वाडेकर,उमेश कांबळे,रिपाई पुणे शहर उपाध्यक्ष ज्वेल अँथोनी, शहाबुद्दीन काझी,आरिफभाई पीरजादे,भीमराव वाघमारे शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष अविनाश कदम,सचिव सचिन चव्हाण महादेव साळवे,अमितजी मोहिते, रिकेश पिल्ले,निलेश वाघमारे राजेंद्र शिंदे,ज्ञानेश्वर जावीर, आण्णा आठवले,भीमा गायकवाड,आठवले बाळू मोरे,अनिस रोकडे,सादिकभाई शेख,संजय गजरमल रमेश खरात विलास जाधव महेश गायकवाड के.के.कांबळे, महिंद्र निकाळजे रूपेश, पिल्ले,रुपेश मोहिते सुप्रिया निकाळजे भडारी मावशी स्वप्निल साबळे पुष्पक,निकाळजे तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading