Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

कथक डान्स फेस्टिवल १९, २० व २१ ऑगस्ट रोजी

पुणे: पश्चिम क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्र, सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार व महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यसंस्था डॉ. नंदकिशोर कपोते कल्चरल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने व ललित कला केंद्र , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सहकार्याने शास्त्रीय नृत्य महोत्सव “अंदाज ” आयोजित केला गेला आहे. कथक नृत्यातील चार घराणी लखनौ, जयपूर, बनारस आणि रायगड यांच्यावर प्रकाश टाकणारा हा कार्यक्रम असून, या कार्यक्रमास देश – विदेशातील अनेक नामवंत दिग्गज कलाकार हजेरी लावणार आहेत.
दिनांक १९, २० व २१ ऑगस्ट २०२२ ला हा नृत्य महोत्सव आयोजित केला आहे. दिनांक १९ व २१ ऑगस्ट ला पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन व दिनांक २० ऑगस्ट ला पं. भीमसेन जोशी सांस्कृतिक भवन येथे सायंकाळी ५-८ या वेळात हे कार्यक्रम होणार असून, कार्यक्रमास प्रवेशमुल्य नाही.
शुक्रवार, दिनांक १९ ऑगस्ट रोजी डॉ. पं. नंदकिशोर कपोते,पुणे (लखनौ घराणा), विदुषी जयंती माला,मुंबई (बनारस घरणा) व विदुषी नंदिता पुरी, चंदिगड (जयपूर घरणा) हे कथक नृत्य सादर करतील, तर शनिवार २० ऑगस्ट ला श्रुती पत्की , अमिरा पाटणकर, पुणे, आर्यव आनंद, दिल्ली (लखनौ घरणा), पं. रामलाल बारेथ व भूपेंद्र बारेथ, विलासपुर (रायगड घरणा), पद्मश्री डॉ.पुरू दाधीच व हर्षिता दाधीच, इंदौर (जयपूर घराणा) हे कथक नृत्य सादर करतील. तर रविवार दिनांक २१ ऑगस्ट रोजी भार्गवी देशमुख व वेणू रिसवडकर, पुणे , इप्शीता मिश्रा, दिल्ली (लखनौ घराणा, पं. बिरजू महाराज यांची पुतणी व पं. शंभू महाराज यांची नात), विदुषी सास्वती सेन, दिल्ली (लखनौ घराणा) व पद्मश्री प्रताप पवार, लंडन (लखनौ घरणा) हे कथक नृत्य सादर करणार आहेत.
अशा प्रकारचा घराण्यांवर आधारित कार्यक्रम महाराष्ट्रात प्रथमच होत असून एकाच रंगमंचावर सर्व घराण्यांतील दिग्गज कलाकारांचे कथक नृत्य पाहण्याची सुवर्ण संधी सर्व रसिकप्रेक्षकांना मिळणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading