Thursday, May 7, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

पुढच्या वेळेला पुण्यात येईल तेव्हा मंत्रिपद घेऊन येईल -भरत गोगावले

पुणे : राज्य सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले नाराज असल्याची चर्चा आहे. गोगावले यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत आपण नाराज नसल्याचे सांगितले आहे. मंत्रीपद मिळणार का याबाबत त्यांनी आज पुण्यात अप्रत्यक्षपणे सांगितले.
शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच झाला. या मंत्रीमंडळात भरत गोगावले, बच्चू कडू, संजय शिरसाट यांना स्थान मिळालेले नाही, या तीनही नेत्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळेल. असे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. तुमच्या समोर सांगतो. पुढच्या वेळेला पुण्यात येईल तेव्हा मंत्रिपद घेऊन येईल. असे शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी पुण्यात पत्रकारांना सांगितले.
भरत गोगावले म्हणाले, काही लोकं आमदार, खासदार बनले आणि परदेशी फिरायला गेले पण माझी बायको म्हणाली ४ दिवस तरी कुठे चला पण जायला जमलं नाही. निवडणुकीत निवडून आल्यापासून काम करत आहोत, उगाच ग्रामपंचायत, जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवार उगाच निवडून आले नाहीत. आमचे फोन २४ तास चालू असतात. आज पुण्यात, पिंपरी चिंचवड यायचे कारण तुमच्या भावना ऐकायच्या होत्या. म्हणून आज पुण्यात आणि पिंपरी चिंचवडला आलो आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे असताना तुमचे काम झाले नाहीत, पण आम्ही १.५ वर्षात सगळी कामं करू.आम्हाला तुमच्याकडून पाच वर्षातून एकदा आशीर्वाद हवा आहे,” असे ते म्हणाले. असे भरत गोगावले म्हणाले.
काही दिवसापूर्वी पुण्यात शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. त्यावर गोगावले म्हणाले, उदय सामंत यांच्यावर हल्ला झाला होता. त्यामुळे काही लोकांना वाटलं आमच्यावर पण होईल पण आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. उदय सामंत बिचारे गाडीत होते मी असतो तर बाहेर येऊन बघितले असते. असे भरत गोगावले म्हणाले.
शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याबाबत गोगावले यांनी आज टीका केली. ते म्हणाले, “आदित्य ठाकरेंनी यापूर्वी दौरे केले असते आणि विश्वासात घेतले असते तर हे झालं नसतं.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading