महाज्योती संस्थेच्या वतीने व्यवसायिक पायलट प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या ऋतुंबरा देवकते व भाग्यश भागवत यांचा सत्कार
पुणे : सद्गुरू सेवा प्रतिष्ठान, पुणे च्यावतीने आंतरराष्ट्रीय युवा दिन, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुण्यदिन व भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्त युवा चर्चा सत्र व युवा प्रेरणा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रमाचे आयोजन आज पत्रकार भवन,नवी पेठ,पुणे करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमामध्ये युवा प्रेरणा पुरस्कारासाठी निवड झालेल्या युवा समाज सुधारकांचा पुरस्कार देऊन ओबीसीचे युवा प्रदेश अध्यक्ष चेतन शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व कार्यक्रमाची सुरुवात केली.
चर्चा सत्रामध्ये विविध वक्त्यांची त्यांचे विचार मांडले. तसेच अहिल्याबाईचे कार्य,विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहचावेत यासाठी प्रसिद्ध लेखिका मा.दर्शनाताई पवार (रा.अमळनेर) लिखित ‘संघर्षमूर्ती अहिल्याई’ पुस्तकाचे लोकार्पण माजी नगरसेविका तथा बालरंजन केंद्राच्या संस्थापिका मा.माधुरीताई सहस्त्रबुद्धे, पुणे मनपाचे ब्रँड अंबेसिडर तथा बुक क्लबचे संस्थापक मा.अविनाशजी निमसे, वक्ते प्रवीण शिंदे,कवी दिगदर्शक हृदयमानव अशोक व माझे हस्ते करण्यात आले.
त्याच बरोबर महाज्योती द्वारे व्यावसायिक पायलट प्रशिक्षणासाठी पुणे जिल्ह्यातून कु.ऋतुंबरा देवकते
व भाग्यश भागवत यांची निवड झाली आहे त्यांचाही सत्कार चेतन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
