विनायक मेटे यांचा अपघात नेमका कशामुळे झाला याची योग्य चौकशी केली जाईल -भरत गोगावले
पुणे:मराठा समाजासाठी आग्रही भूमिका घेणारे शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष व आमदार विनायक मेटे यांच्या अपघातात दुःखद निधन झाले. त्यांच्या दुःखद निर्णयामुळे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यावरविनायक मेटे यांच्या जाण्याने मराठा समाज पोरका झाला आहे. कोण्याच्याही स्वप्नात नसेल बिचाऱ्यांचं असं अपघाती निधन होईल .वस्तुस्थिती आत्ताच कोणी सांगू शकत नाही. अपघात नेमका कशामुळे झाला.हे सरकारच्या मार्फत योग्य चौकशी केली जाईल त्यामध्ये काही वाटलं तर पुढची कारवाई करू . असे आश्वासन शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिले आहे.
आज शिंदे गटाचा पुण्यात स्नेह मेळावा पार पडला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
नाना पटोले यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत, हे सरकार असविंधनिक आहे. ही काँग्रेस ची भूमिका आहे.हि धोक्याची घंटा देशाच्या लोकशाही साठी आहे . justice delay देशासाठी धोक्याचे आहे. सुप्रीम कोर्टाने त्यावर तातडीने कारवाई करावी . असे वक्तव्य केले होते. त्यावर भरत गोगावले म्हणाले.खाते वाटप झाले नाही यात नानांना अडचण काय आहे ? असा सवाले भरत गोगावले यांनी नाना पटोले यांना उपस्थित केला.
अतिवृष्टी जिथे झाली तिथे मदत नाही मिळाली .शेतकऱ्यांचे प्रश्न आणि तिरंग्याचा मुद्दा याबद्दल आम्ही सरकारला प्रश्न पावसाळी अधिवेशनात विचारणार आहोत . असे नाना पटोले आज म्हणाले त्यावर भरत गोगावले गावले म्हणाले,
आम्ही बांधावर पण जाऊ पाऊस जरा जास्त आहे पाऊस कमी होऊद्या बांधावर पण जाऊ आणि मदत पण देऊ .विरोधकांना आता काही संधी राहिलेली नाही काहीतरी पाहिजे म्हणून ते बोलत आहेत . असे भरत गोगावले म्हणाले.
खाते वाटप हे अजून जाहीर झाले नाही म्हणून विरोधी पक्ष सारखे टीका करत आहेत.
शिवसेना नक्की कोणाची आहे . याचा निकाल अजून सुप्रीम कोर्टात बाकी आहे. शिवसेनेच्या साईटनेचा निकाल लागेल असे काही तज्ञ म्हणत त्यावर भरत गोगावले म्हणाले,जादूची कांडी असू शकते. त्यात एवढं काळजी करण्याची गरज नाही. कारण जी वस्तुस्थिती आहे .त्याला आम्ही सामोरे जात आहोत .त्यामुळे कोर्टाला देखील विचार करणे गरजेचे आहे कोर्ट जो निर्णय देणार आहे तो विचार करून देणार आहे . असे भरत गोगावले म्हणाले.
