शरद पवार यांनी उद्धव ठाकरे वर लिंबू फिरवला का? वक्तव्यावर भरत गोगावले यांचे स्पष्टीकरण
पुणे: भाजपसोबत युती करून सत्ता चालवू असे सांगितले असते तर आम्ही पाच पावलं मागे आलो असतो. पण शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कुठं लिंबू फिरवला आणि कुठल्या भक्ताकडे गेले माहीत नाही, असे गोगावले यांनी म्हटलं होते. त्यावर राजकारण हेचांगले तापले आहे.लिंबाचा काही भाग नाही ती मराठी माणसाची म्हण आहे त्याप्रमाणे मी बोलून गेलो. अशी प्रतिक्रिया पुण्यात पत्रकारांशी बोलताना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी दिली.
महा विकास आघाडी मधील मंत्री एकनाथ शिंदे व फडणवीस सरकारवला हे सरकार असंविधानिक आहे. हे सरकार जास्त काळ टिकणार नाही असे म्हणत आहेत. त्यावर भरत गोगावले म्हणाले,थोड्याच दिवसांत कळेल सरकार संविधानिक आहे .की असंविधानिक असे भरत गोगावले म्हणाले. मुख्यमंत्री २० तास कोणासाठी काम करत आहेत हे बघायला पाहिजे
आम्ही रात्री १ वाजेपर्यंत काम करतो. काही लोकांना झोप लागत नसेल .आम्ही जनतेच्या हितासाठी काम करतो आहे. असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षनाना पटोले यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला त्यावर भरत गोगावले म्हणाले,
शिंदे साहेब हे दिघे साहेबांच्या तालमीत तयार झाले आहेत आणि दिघे साहेबांच्या तालमीत तयार झालेली व्यक्ती याला कामाची आणि झोपेची काही अडचण नसते ते त्याप्रमाणेच काम करत असतात . असे भरत गोगावले म्हणाले.
एकनाथ शिंदे घाटातील आमदार उद्या दिल्ली दोऱ्यावर जात आहेत. त्यावर विरोधकांनी टीका केली आहे. त्यावर भरत गोगावले म्हणाले,
काही महत्वाचे काम असेल तर जायला नको का ? हर घर तिरंगाचा कार्यक्रम दिल्लीला ठेवला आहे मग जायला नको का ? असा सवालही भरत गोगावले यांनी उपस्थित केला. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मोदी सरकारने हर घर तिरंगा हा उपक्रम राबविला आहे. राज्यात काही झेंडे हे निष्कृष्ट दर्जाचे सापडले आहेत. त्यावर भरत गोगावले म्हणाले,जेचूक आहे ते चूकच आहे, झेंडे जर खराब आले असतील तर निश्चित कारवाई होईल . असे भरत गोगावले म्हणाले.
