Saturday, May 9, 2026
Latest NewsPUNE

तुळशीबागेत ‘हर दुकान हर पथारी’ तिरंगा 

पुणे : जगभरात प्रसिद्ध असलेल्या तुळशीबागेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त  दुकानदार व पथारी व्यावसायिकांनी ‘हर दुकान हर पथारी तिरंगा’ ही संकल्पना राबवित आपल्या दुकानावर अभिमानाने तिरंगी ध्वज लावला. त्यामुळे स्वातंत्र्याच्या निमित्ताने  संपूर्ण तुळशीबाग परिसर तिरंगामय झाला होता.
श्री तुळशीबाग गणपती मंडळ, श्री तुळशीबाग पतसंस्था, तुळशीबाग व्यापारी असोसिएशन यांच्या वतीने तुळशीबागेत दुकानदार व पथारी व्यावसायिकांना तिरंगी ध्वजाचे वाटप करण्यात आले. तसेच वीरपत्नी यांचा कृतज्ञता सन्मान यावेळी करण्यात आला. राज्याचे  कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे उपस्थित राहून उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी  स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, विकास पवार, विनायक कदम, नितीन पंडित, महेश अग्रवाल, गजानन शालगर , दुर्गेश नवले, राजेंद्र साखरीया, किरण चौहान, संजीव फडतरे, गणेश रामलिंग, श्री देव, कुशल पारेख, किरण भंडारी, प्रदिप इंगळे, राजेश शिंदे, अभिजीत वाळके,गणपत जैन, मदनसिंह रजपूत, सचिन जोशी, सुनिल इनामदार,अनिल प्रभुणे, प्रवीण सोनार, संदिप थोरवे, प्रकाश पवार,सौरभ कदम,अभिनव वाळके  उपस्थित होते.
भारतीय सैनिकांच्या वीरपत्नी दिपाली मोरे, सोनाली फराटे, शितल जगदाळे, मीनाक्षी भिसे, प्रतिभा खटके यांचा सन्मान महिला पदाधिकारी आणि व्यापारी प्रतिनिधी यांच्या वतीने करण्यात आला. आरती पाटील या दिव्यांग आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन पटूला थायलंड ओपन पॅरा बॅडमिंटन स्पर्धेसाठी तुळशीबाग पतसंस्थेच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली. नितीन पंडित यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading