तिरंगा अभियानात, राष्ट्रीय ध्वज संहितेचा अनादर होऊ नये नागरीकांनी काळजी घ्यावी -काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी.
काँग्रेसजन व राष्ट्रप्रेमी परंपरेप्रमाणे स्वातंत्र्यदिनी ‘ध्वज-संहीतेचे पालन करत’ तिरंगा फडकवतील
पुणे : तिन्ही रंगांचा राष्ट्रीय अर्थ, भावना व तिरंगा ध्वजाचा मतिथार्त समजूनच हर घर तिरंगा अभियान राबवले गेले पाहीजे.. ‘राष्ट्रध्वज तिरंगा मान उंचावुन पाहता यावा’ अशा व इतक्या उंचीवर ‘राष्ट्रीय तिरंगा ध्वज’ लावला जावा.. हर घर तिरंगा अभियानात .. राष्ट्रीय ध्वज संहितेचे पालन व्हावे, त्याचा अनादर होणार नाही याची नागरीकांनी किमान काळजी घ्यावी, असे आवाहन काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले..
हा ‘तिरंगा लावणे’ हा विषय इव्हेंट पुरता मर्यादीत नसून, राष्ट्रीय भावनेचा, स्वातंत्र्य संग्रामातील शहीदांच्या विजयाचा व स्वातंत्र्य चळवळीचा गौरव असुन, स्वातंत्र्य मिळुन “लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्राची (लोकांमधून, लोकांकरीता, लोकांनी बनवलेले सरकार) ओळख” सार्वभौम भारताच्या माध्यमातुन झालेल्या ऐतिहासीक क्षणांचा अमृत महोत्सव असल्याची भावना प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरीकाने लक्षात ठेवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंध्येस काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.. तिरंगा हा खादी, हातमाग वा स्वदेशी कापडाचा असावा, अशीच त्यामागील धारणा होती.! अमृत महोत्सव निश्चित होता, तर स्वदेशी कापडातून देखील ‘देशांतर्गत तिरंगा ध्वजांचे ऊत्पादन व वाटप केंद्रातील सरकारला शक्य झाले असते’ व शासकीय पैशांचा चुराडा होऊन देखील पुरवण्यात येणारे “निकृष्ट झेंडे परत पाठवण्याची वेळ व नामुष्की प्रशासनावर आली नसती”..
संपुर्ण देशभर खरेदी केले जाणारे पॅालीस्टर झेंडे चिन कडुन व गुजरात राज्यातुनच येत असल्याचे निदर्शनास येते आहे अशी टिका ही काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी या प्रसंगी सांगीतलें..!
