Saturday, May 9, 2026
Latest NewsPUNE

महात्मा गांधी यांच्या विचारांने राष्ट्राचा सन्मान – श्रीरंग चव्हाण पाटील

पुणे : महात्मा गांधी यांच्या विचारांचे राष्ट्राचा सन्मान होत आहे.असे प्रतिपादन प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग चव्हाण पाटील यांनी खडकवासला येथील ऐतिहासिक महात्मा गांधी चौकात पुणे जिल्हा काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या आझादी गौरव पदयात्रेच्या स्वागत प्रसंगी केले. काँग्रेसचे  देवीदास भन्साळी ,जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय  जगताप यांच्यासह जिल्हा काँग्रेस मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत खडकवासला विधानसभा मतदाता स॓घात आझाद गौरव यात्रेस डोणजे, खडकवासला येथे जनतेचा भरभरून प्रतिसाद… जरा याद करो कुर्बानी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी निमित्ताने पुणे जिल्हा काँग्रेस पक्षाच्या पुढाकाराने आझादी गौरव पदयात्रा आज खडकवासला गावामध्ये वाजत गाजत अतिशय उत्साहाने बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्ते व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संपन्न झाली

याप्रसंगी खडकवासला भागातील शहीद मेजर शशीधरण नायर व को पायलट शहीद विजय कारले यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली याप्रसंगी पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे सह प्रभारी दादू शेठ खान, पुणे जिल्हा काॅग्रेस उपाध्यक्ष संग्राम मोहोळ, अवधूत मते, खजिनदार महेश ढमढरे, पुणे जिल्हा किसान काँग्रेस अध्यक्ष सुरेश गोरे पु म पा वृक्ष संवर्धन समितीचे सदस्य मिलिंद पोकळे, पुणे जिल्हा काँग्रेसचे अतुल कारले ,हवेली तालुका अध्यक्ष सचिन बराटे,  राहुल मते पाटील , सुरेश मते , विजय लगड , सोपान मते, मा सरपंच सौरभ मते ,मा सरपंच प्रशांत नानगुडे ,हवेली तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष रघुनाथ यादव,  सुधाकर बोरकडे, बाळासाहेब प्रताप काँग्रेस नेते, खडकवासला काँग्रेस कमिटीचे युवक अध्यक्ष राहुल सोनवणे, खडकवासला काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष संजय अभंग, युवा नेते निलेश सांगळे काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते शंकरराव रायकर, साहेबराव मते ,रमेश मते बाळासाहेब मते तसेच बहुसंख्येने कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते, वारजे येथे सा॔गता होऊन मुळशी कडे यात्रेचे प्रस्थान झाले .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading